इनरव्हील क्लब औरंगाबादचा पदग्रहण सोहळा: नूतन अध्यक्ष छाया भोयर यांनी स्वीकारला पदभार

उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांची प्रमुख उपस्थितीत 

औरंगाबाद,१३ जुलै /प्रतिनिधी :- इनरव्हील क्लब औरंगाबादचा पदग्रहण सोहळा उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल विट्स येथे मोठ्या थाटात झाला. इनरव्हील क्लब, औरंगाबादच्या मावळत्या अध्यक्षा  लता पद्माकर मुळे यांच्याकडून नूतन अध्यक्ष छाया भोयर यांनी पदभार स्वीकारला. याप्रसंगी उत्तम वक्ता व अष्टपैलू व्यक्तिमत्व असणार्‍या उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी आपल्या ओघवत्या भाषेत मार्गदर्शन करुन त्यानी उपस्थितांची मने जिंकून घेतली.          

नूतन अध्यक्ष छाया भोयर यांनी त्यांच्या पुढील कार्यकालात पर्यावरण संरक्षणासंबंधी  पाणी वाचवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा, पावसाच्या पाण्याचे पुनःर्भरण,सौरऊर्जा वापर व निर्मिती यावर भरीव काम करण्याचा मनोदय व्यक्त केला.                                       

मावळत्या अध्यक्षा लता मुळे यांनी आपल्या कार्यकाळात समाजातील गोरगरीब, कष्टकरी, अनाथ व्यक्तींसाठी तसेच महिलांच्या सर्वांगीण विकास व सबलीकरणासाठी मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तसेच घटकांतील महिला व मुलींना शिक्षणासाठी मदत तसेच त्यांची मोफत वैद्यकीय तपासणी आणि उपचार शिबीर घेऊन मुलींच्या आत्म सुरक्षेसाठी त्यांना प्रशिक्षण दिले असल्याचे सांगितले. इनरव्हीलने  सातारा परिसर येथील संकल्प वनराईमध्ये वड, पिंपळ, चिंच,उंबर, कांचन इत्यादी विविध प्रकारच्या देशी वृक्षांचे वृक्षारोपण केले आहे. तसेच तुळशीची रोपे लावून ऑक्सिझोन निर्माण केला आहे. संकल्प वनराई टीमसोबत पर्यावरण संवर्धनाबद्दल सामाजिक बांधिलकी जपली आहे. फक्त वृक्षारोपण करुन न थांबता त्यांचा सांभाळ करून वृक्षसंवर्धनासाठी येथे पाण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. साठवणुकीसाठी पाच पाण्याच्या टाक्यांची व्यवस्धाही करून दिली आहे. ग्रामीण भागातील जनतेला अंधारामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यामुळे खेड्यातील गरजवंताना सोलर लॅम्पचे केले असल्याचे नमूद केले.  

            इनरव्हील क्लब औरंगाबाद क्लबची नूतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे अध्यक्ष -छाया भोयर, उपाध्यक्ष- डॉ.ईना नाथ, माजी अध्यक्ष -लता मुळे, सचीव -मंगल चव्हाण,कोषाध्यक्ष -अंजली सावे, आय एस ओ. -अंजली दाशरथी, संपादक -रेखा केदारे, क्लब वार्ताहर- ईंदुमती काळे, कार्यकारी समिती सदस्य- माजी जिल्हाध्यक्ष व सल्लागार ऊषा धामणे, आशा भांड, शामल भोगले, अलका मेहता व वृषाली उपाध्ये, 

शामल भोगले यांच्या मधुर ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रतिभा धामणे यांनी प्रभावीपणे सूत्रसंचालन केले. डाॅ. ईना नाथ यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डाॅ. श्रीकांत देशमुख, डॉ. सुभाष भोयर,  डाॅ. जयश्री देशमुख, डाॅ. उल्हास शिंदे,डाॅ. गणेश डोंगरे, डाॅ. लता काळे, डॉ. दत्तात्रय शेळके, अशोक आहेर, सुमित भोयर, सादी भोयर, नात मायरा, बहिण तनुजा तसेच अनेक मैत्रिणींची क्लब सदस्यांसह मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.