विजेची तार अंगावर पडून मृत पावलेल्या कन्नड तालुक्यातील मजुरांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपयांची मदत जाहीर

आ. बोरणारे यांच्याकडून प्रत्येकी 50 हजार रुपयांची रोख मदत

वैजापूर,१२ जुलै /प्रतिनिधी :- विजेची तार ओढताना ती अंगावर पडून या घटनेत मृत पावलेल्या कन्नड तालुक्यातील नावडी गावातील मजुरांच्या कुटुंबियांची वैजापूरचे आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी आज भेट घेतली तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृत पावलेल्या मजुरांच्या कुटुंबास प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. आ.बोरणारे यांनीही त्यांच्याकडून प्रत्येकी 50 हजार रुपयांची रोख मदत देऊन त्यांचे सांत्वन केले.

या प्रसंगी सुनील सोनवणे, रणजीत चव्हाण, संजय बोरनारे, सुनिल सोनवणे, सरपंच विलास जाधव, उपसरपंच निवृत्तीनाथ मुरकुंडे, प्रकाश मगर, सचिन थोरात, भाऊसाहेब थोरात, शैलेंद्र गांगुर्डे, चंदू अण्णा देशमुख, गणेश मुरकुंडे, सुरेश मगर, रामेश्वर आढाव, कल्याण भिडे, निलेश चव्हाण, नवनाथ राठोड व  ग्रामस्थ उपस्थित होते.