वैजापूर तालुक्यातील नांदगाव शाळेत बाल वारकऱ्यांचा रिंगण सोहळा

वैजापूर,१२ जुलै /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील  जि. प. प्राथमिक शाळा नांदगाव येथे आषाढी एकादशी निमित्ताने शाळेतील उपक्रमशील शिक्षक  सोनाली कुमावत, सुवर्ण कडलग, विलास त्रिभुवन, किशोर चंन्ने यांच्या मार्गदर्शनात बाल वारकरी यांनी विठुरायाच्या नामाच्या गजरात मोठ्या उत्साहात दिंडी कडून रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला.

दिंडी शाळेपासून विठ्ठल नामाचा गजर करत संपूर्ण गावातून फिरून पुढे महंत गुलाबगिरी महाराज यांच्या शिवशक्ती आश्रमात पोहोचली. तेथे बाल वारकऱ्यांनी रिंगण करून फुगड्यांचा, वेगवेगळ्या अभंगाच्या चालीवर टाळ मृदंगाच्या नादात पावली घेतली. त्या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक  शिवाजी कुमावत यांनी विद्यार्थ्यांना वारीचा व रिंगण सोहळ्याचा महिमा समजावून सांगितला. शिवशक्ती आश्रमांकडून विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी महंत गुलाबगिरी  महाराज, सरपंच अलकाताई गायकवाड, उपसरपंच शरद कोल्हे , नवनाथ कोल्हे,  नारायण राहणे, बाबासाहेब गाढे, संदीप गायकवाड, योगेश जाधव, राजाराम निकम,कोल्हे ताई, माया सोळसे, पूजा काळे, काजल राहणे आदींची उपस्थिती होती.