पेंडेफळ सोसायटीच्या चेअरमनपदी शिवसेनेचे गोकुळ आहेर

वैजापूर,१२ जुलै /प्रतिनिधी :-तालुक्यातील पेंडेफळ सोसायटीच्या चेअरमनपदी शिवसेनेचे गोकुळ आहेर यांची दुसऱ्यांदा तर व्हाईस चेअरमनपदीपदी यशवंत पठारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या सोसायटीच्या संचालक मंडळाची नुकतीच निवडणूक घेण्यात आली.या निवडणूकीत
शेतकरी विकास पॅनलचे सर्व म्हणजेच 12 संचालक निवडून आले.अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी टी.एन.गोमलाडू यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची विशेष सभा घेण्यात आली. त्यांना सचिव संतोष काटे यांनी सहाय्य केले. यावेळी संचालक कृष्णा आहेर, भाऊसाहेब आहेर, बापू आहेर, चांगदेव आहेर, राजाराम चव्हाण, महेश आहेर, इंदुबाई कचरु आहेर, वनमाला आहेर, शोभा आहेर व इंदुबाई गोकुळ आहेर यांची उपस्थिती होती.नवनिर्वाचीत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा बाजार समीती मध्ये शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी बाजार समितीचे माजी सभापती संजय निकम , राजेंद्र  कराळे, रावसाहेब जगताप, संजय  आहेर, शिवाजी आहेर, विठ्ठल चव्हाण,मनोज पठारे,मन्सुब आहेर, अमोल आहेर, योगेश चव्हाण, बद्रीनाथ आहेर, भगवान आहेर, संभाजी आहेर, कडु आहेर, राहुल आहेर यांची उपस्थिती होती.