भांगसीमाता गडावर जैवविविधता अनुभवता यावी : परमानंद गिरी

  • गडावरील वृक्षारोपण  मोहिमेस प्रारंभ
  • मेटल कंपनीकडून 400 वृक्षांचे रोपन करण्याचा निर्धार
  • पर्यावरणप्रेमी, नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन

औरंगाबाद,११ जुलै /प्रतिनिधी :- वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें। पक्षी ही सुस्वरें आळविती ।। असे संत तुकाराम महाराजांनी जीवनात वृक्षांचे महत्त्व असल्याचे अभंगातून सांगितले. संत तुकारामांच्या शिकवणीनुसार  वृक्ष हेच आपले सगेसोयरे आहेत. वृक्षांमुळेच पक्षीही येथे नामस्मरण करतात, असाच भांगसीमाता गडाचा परिसर व्हावा. हा गड विविध दूर्मिळ वनौषधींयुक्त झाडे, जैवविविधतेने नटलेला असावा, त्याची अनुभूती येथे येणाऱ्या प्रत्येकाला यावी,  यासाठी नागरिकांनी, पर्यावरणप्रेमी संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन श्री श्री 1008 महामंडलेश्वर परमानंद गिरी यांनी केले.

आषाढी एकादशीनिमित्ताने गडावर यंदाच्या वृक्षारोपण  मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन टेकडी पर्यावरण ग्रुप आणि मेटलमन ऑटो कंपनीने केले. यावेळी  श्री श्री 1008 महामंडलेश्वर परमानंदगिरी यांच्याहस्ते वृक्षाचे रोपन करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मेटलमन कंपनीचे सीओओ श्रीकांत मुंदडा, वन परिक्षेत्र अधिकारी अनिल पाटील, माहिती व जनसंपर्क विभागाच्या माहिती केंद्राचे माहिती सहायक डॉ. श्याम टरके यांच्या हस्तेही गडावर वृक्षांचे रोपन करण्यात आले. कार्यक्रमास मेटलमनचे सरव्यवस्थापक प्रकाश एखंडे, प्रकल्प प्रमुख अवधूत शिंदे, कल्याण पिनप्रतिवार, नारायण ‍निकम, गुरूदास पराते, किशोर जगताप, वैशाली घाग, सूर्यकांत शानबाग, प्रवीण जोशी, मकरंद निखाडे, मेटलमन ऑटो कंपनी ग्रुप आणि टेकडी पर्यावरण ग्रुपचे सांडू पवार, रूपचंद अग्रवाल, प्रकाश भगत,  कैलास चव्हाण, विष्णू सोमासे, नवनाथ राजे, बालासाहेब माने, साहेबराव पवार, राजू गोरगिले, राजेंद्र मोरे,‍ विवेक जाधव, श्रीराम पोटगटे,  ‍सिद्धार्थ डांगे, सुदाम कातोरे, बालाजी घाटकर, श्री.बावा आदींसह टेकडी ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते. 

पर्यावरण रक्षणासाठी मेटलमनने नेहमीच व सातत्याने पुढाकार घेतलेला आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्याप्रमाणात वृक्षांचे रोपण आणि संवर्धन मेटलमनकडून होत आहे. त्यातच आता भांगसीमाता गडाची भर पडणार आहे. गडावर कंपनीकडून मोठ्या प्रमाणात पर्यावरण रक्षणाचे काम करण्याचा मानस कंपनीचा आहे. यावर्षी आठ फूट उंचीची सुमारे 400 झाडे गडावर कंपनीकडून लावण्यात येणार आहेत, त्या कार्याचा आज शुभारंभ झाल्याचे श्री. मुंदडा म्हणाले. टेकडी ग्रुप करत असलेल्या पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड कामाचेही श्री. मुंदडा यांनी कौतूक केले. ग्रुपच्यावतीने श्री. माने यांनी  वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानंतर ध्यान मंदिरात टेकडी पर्यावरण ग्रुपकडून श्री. मुंदडा व त्यांच्या सर्व सहकार्यांचे शाल, पुष्पगुच्छ्‍ देऊन आभार मानण्यात आले. यावेळी गुरूकुलच्या सर्व विद्यार्थ्यांचीही बहुसंख्येने उपस्थिती होती.