वैजापूरचे एकटा विठोबा मंदीर म्हणजे प्रति पंढरपूर

वैजापूरच्या महाराणा प्रतापसिंह मार्गावर एकटा विठोबाचे मंदिर असून या मंदिराला प्रति पंढरपूर चे विठ्ठल मंदिर मानतात. या मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भक्त भाविकांनी दर्शनासाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मोठी गर्दी केली होती. गेल्या दोन ववर्षापासून कोरोनामुळे विठ्ठलाचे दर्शन नव्हते. गर्दी सातत्याने वाढतच होती. या भक्तांना असे मानतात की, या मंदिराचे पुजारी श्री. जोशी (राजापूरकर) विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. ते आषाढीला कधीही पंढरपूर वारी चुकवत नव्हते, मात्र वृद्धापकाळामुळे ते एका वर्षी गेले नाही त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठलाने साक्षात वैजापूरला येऊन त्यांना साक्षात्कार दिला.तेच हे विठ्ठल, दुसरे असे की पैठणचे संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांची पत्नी गिरजाबाई देशपांडे त्या मुळच्या वैजापूरच्या. एकनाथ महाराज व गिरजाबाई  यांचा साखरपुडा झाला तो याच मंदिराच्या ओट्यावर जो आजही साखर पुड्याची साक्ष देत आहे.,त्यामुळे या मंदिराला विशेष महत्व आहे.

मुंजोबा मित्र मंडळातर्फे प्रसादाचा कार्यक्रम 
प्रसाद वाटपाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  नसगरसेवक स्वप्नील जेजुरकर, अमोल राजपूत, रवींद्र जेजुरकर, कुमोद जेजुरकर, शांतीलाल संचेती, शुभम जेजुरकर, दत्तात्रय खैरे, पुजारी प्रसाद जोशी, शशिकांत भालेराव, आयुष्य संचेती, पुंडलिक चव्हाण, वनिता जेजुरकर, श्रीमती राऊत मावशी, आयुष दाणे, गोकुळ जगताप, कचरू राजपूत, भीमसिंग राजपूत, डॉ.बाळू संचेती, बंटी साकला, दिनेश वैष्णव,संदीप मतसागर, राजेंद्र पेहरकर, शरद राजपूत, धोंडीरामसिंह राजपूत तसेच  मुंजोबा मित्र मंडळाच्या सदस्यांनी  परिश्रम घेतले.