गेवराईमध्ये  ६ आॅगस्ट पर्यंत संपूर्ण संचारबंदी घोषित

नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई–जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड, दि. २९ :– गेवराई शहरात नव्याने कोरोना विषाणूची लागण झालेले ४४ रुग्ण आढळून आलेले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या सहवासित आणि इतर लोकांचा शोध घेऊन तपासणी करण्यात येणार आहे. यासह इतर भागामध्ये विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार गेवराई शहरात ८ दिवसांसाठी (६ आॅगस्ट रोजी रात्री १२.०० वा पर्यंत) संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात येवून कुणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी याबाबत अहवाल सादर केला आहे. गेवराई शहरामध्ये कोवीड-१९चा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता संपूर्ण शहरामध्ये प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करणे आवश्यक असून वरील आदेशा नुसार पुढील निर्देश देण्यात आले आहेत.

१. या कालावधीत वैद्यकीय सेवा, वर्तमानपत्रे व माध्यमांविषयक सेवा २४ तास सुरु राहतील.२.गेवराई शहरात विशेष परवानगी शिवाय कोणालाही या कालावधीत प्रवेश करता येणार नाही व शहराबाहेरही जाता येणार नाही.३. अत्यावश्यक सेवांची ६ शासकीय कार्यालये वगळता (महसूल, पोलीस, ग्रामविकास, नगरविकास. कृषी व आरोग्य ) गेवराई शहरातील सर्व आस्थापना, बँका, शासकीय व खाजगी आस्थापना इत्यादी बंद राहतील. वरील ०६ विभागांचे कर्मचारी कार्यालयीन ओळखपत्राद्वारे शहरांतर्गत प्रवास करु शकतील. ४. गेवराई शहरातील नागरिकांना इतर जिल्हयात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पास मिळणार नाही, परंतु अत्यावश्यक वैद्यकीय (emergency medical ) पाससाठी गेवराई शहरातील नागरिकांनी ऑनलाईन अर्ज http://www.xn--covid-3fl4c.mhpolice.in/ या संकेतस्थळावर अर्ज करुन पास प्राप्त करता येईल. ५. गेवराई शहरातील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू अँप तात्काळ डाऊनलोड करून वापरणे बंधनकारक राहील. कोरोना विषाणूचे अनुषंगाने ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, श्वसनास त्रास ही लक्षणे आढळून आल्यास सदरील अॅपमध्ये self Assessment या सदराखाली आपली माहिती भरावी.६.गेवराई शहरात फिरते दूध विक्रेते यांना परवानगी राहील. कोणत्याही दुकानदारा मार्फत दूध विक्री केली जाणार नाही अथवा दुकान उघडणार नाही. त्यांनी दूध पाकीटांची होम डिलेवरी करावी व ती करत असतांना कोवीड १९ च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करावे.७. जार वाटर सप्लायर यांनी पाणी जारव्दारे वाटप न करता ग्राहकाकडील भांडयामध्ये पाणी दयावे आणि त्यावेळेस कोवीड १९ च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करावे किंवा जार वाटर सप्लायर्स यांनी संपूर्ण जार ग्राहकास दयावे व रिकामी जार परत न घेता त्याच जारमध्ये पुनर्भरणाची घरपोच सेवा दयावी, तसेच सर्व वाटर सप्लार्यस कर्मचारी यांनी नियमानुसार पास काढून घेवून सेवा पुरवावी.८. परवानाधारक भाजी व फळ विक्रेते यांना पूर्वी प्रमाणे परवानगी राहील, पंरतु त्यांनी घरोघरी जावूनच विक्री करावी.९.घरगुती गॅस घरपोच सेवा देतांना गॅस कंपनीचा गणवेश परिधान करावा व त्यांचे गणवेश नसलेले कर्मचारी यांनी नियमानुसार पास काढून सेवा दयावी.१०. मोबाईल कंपनी ऑपरेटर्स यांच्या कर्मचाऱ्यांनी नियमानुसार पास काढून सेवा दयावी.११. वैद्यकीय कर्मचारी व औषधी विक्रेते यांनी दवाखान्याचे ओळखपत्र अथवा ऑनलाईन पास द्वारे गेवराई शहरांतर्गत प्रवासास परवानगी देण्यात आली आहे.यासह जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणेबाबतचे आदेश स्वतंत्र काढण्यात येतील असे सदर आदेशात नमूद केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *