‘पंढरीची वारी, संतांची मांदियाळी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन

औरंगाबाद ,१० जुलै  /प्रतिनिधी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत तथा वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाच्या आषाढी एकादशीनिमित्त एमजीएम संस्कार विद्यालयात श्री विठ्ठलाची महाआरती करून हरिनामाच्या जयघोषात, विविध संतांच्या वेशभूषेत, टाळ ,मृदंग, चिपळीच्या गजरात एमजीएम परिसरात वृक्षदिंडी व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले.

विठुरायांच्या भक्ती संगीतावर आधारित विविध नृत्याविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यात विद्यार्थ्यांनी पारंपारिक वारकरी फुगडी, पारंपारिक लोकनृत्य सादर केले. त्याप्रसंगी विद्यालयाच्या संचालिका डॉ.अपर्णा कक्कड, प्राचार्या उषा जाधव ,मुख्याध्यापिका स्मिता कुलकर्णी ,पर्यवेक्षक विशाल भुसारे आदींनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन सर्वांचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री संतोष धुमाळ ,श्री संदीप कदम, श्री विवेक पाटील ,श्री शरद पवार व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदिनी परिश्रम घेतले.