राज्यात २७६० नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान, एकूण १८६७२ ॲक्टिव्ह रुग्ण

देशात २४ तासांत १८,८४० नवे रुग्ण, ४३ जणांचा मृत्यू

मुंबई ,९ जुलै /प्रतिनिधी :- राज्यात आज २७६० नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर पाच कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. आज रोजी एकूण १८६७२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज २९३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजपर्यंत एकूण ७८,३४,७८५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९२% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२३,४५,३२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,०१,४३३ (०९.७२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

देशात २४ तासांत १८,८४० नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत भारतात १८ हजार ८४० नवीन कोविड रुग्ण आढळले आहेत. तर ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या देशात सक्रिय प्रकरणं १,२५,०२८ आहेत. अहवालानुसार देशातील दैनंदिन सकारात्मकता दर ४.१४ टक्के आहे, तर पुनर्प्राप्तीचा दर ९८.५१ आहे. १६,१०४ लोक बरे झाले आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १९८.६५ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.काल म्हणजेच ८ जुलै रोजी १८,८१५ प्रकरणे प्राप्त झाली असून ३८ मृत्यूची नोंद झाली. याआधी म्हणजेच, ७ जुलै रोजी १८,९३० प्रकरणे नोंदवली गेली होती, तसेच ३५ लोकांचा मृत्यू झाला होता.