शेतकऱ्यांना मदतीचा हात ; नालेगाव येथील 149 शेतकऱ्यांना बियाणे वाटप

वैजापूर ,८ जुलै  /प्रतिनिधी :-शेतकऱ्यांना मदतीचा हात या अंतर्गत केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड व ग्रीन ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथील 149 शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे वाटप करण्यात आले.

भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव यांच्या हस्ते बियाणे वाटप करण्यात आले.याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दागोंडे, कोषाध्यक्ष संतोष पाटील मिसाळ, तालुका चिटणीस राजूभाऊ देशमुख, किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष वसंत शेलार, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष संतोष पाटील आवारे, सहकार आघाडी तालुका उपाध्यक्ष सचिन घोडक,  बुथ अध्यक्ष गणेश चौथे, मिनीनाथ सातपुते गणेश काकडे, सुभाष अण्णा काकडे, सरपंच गहिनीनाथ बागुल  यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.