वैजापूर तालुक्यात विधवा सन्मान व संरक्षण अभियानाची अंमलबजावणी करा ; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

वैजापूर ,७ जुलै  /प्रतिनिधी :- अनिष्ठ प्रथांचे निर्मुलन करण्यासाठी वैजापूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी विधवा सन्मान व संरक्षण अभियानाची अंमलबजावणी करावी असे निवेदन अभियानाचे प्रदेश मार्गदर्शक बाबासाहेब वाघ यांच्या पुढाकाराने गटविकास अधिकारी कैलास जाधव यांना निवेदन देण्यात आले.

तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीना विधवा अनिष्ट प्रथा निर्मूलनाचे काम शासन निर्णय 17 मेच्या निर्णया आधारे जलद गतीने पुर्ण व्हावे व आभियानाची गती वाढावी यासाठी वैजापुर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते यांनी तालुक्यातील गटविकास आधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. या प्रसंगी  प्रा. वनिता दायटे, अँड. नुजहत, नाभिक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दिलीप अनर्थे, अंगंणवाडी कार्यकर्ते शितल राजपूत, उत्तमराव पवार, निशिगंधा दलाल, राधा घुसिंगे, अनिल शेजवळ आदी उपस्थित होते.