भारताच्या एकत्रित चाचण्या 1.77 कोटींच्या पुढे

कोविड रुग्णांमध्ये मृत्यूदर (सीएफआर) 1 एप्रिलपासून सर्वात कमी, 2.23 टक्क्यांवर
बरे झालेल्या रुग्णांची संख्या दहा लाखांच्या जवळ

नवी दिल्ली, 29 जुलै 2020

राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेशांनी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली चाचण्या वाढवून, तातडीने संपर्क ओळखून कोविड-19 रुग्णांचे अलगीकरण करण्यात येत आहे.

गेल्या 24 तासांत 4,08,855 नमुना चाचण्या करण्यात आल्या, यामुळे प्रतिदशलक्ष लोकांमागे चाचण्यांची संख्या वाढून आता 12,858 झाली आहे आणि एकूण चाचण्यांची संख्या 1.77 कोटींच्या पुढे गेली आहे.  

देशातील 1316 प्रयोगशाळांसह चाचणी प्रयोगशाळेचे जाळे सातत्याने बळकट केले जात आहे.सध्या 906 सरकारी प्रयोगशाळा आणि 410 खासगी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. या मध्ये खालील प्रयोगशाळा समाविष्ट आहेत :

  • रिअल टाइम रॅपिड टेस्ट पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा 675 :  (शासकीय : 411 + खासगी : 264)
  • ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा : 537 (शासकीय :  465 + खासगी : 72)
  • सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा 104: (शासकीय : 30 + खासगी 74)

केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या “चाचणी, मागोवा, उपचार” (टेस्ट, ट्रॅक, ट्रीट) या धोरणाच्या समन्वयीत अंमलबजावणीमुळे  रुग्णांमधील मृत्यूदर (सीएफआर) जागतिक पातळीच्या तुलनेत प्रभावीपणे कमी करण्यावर भर दिला आहे, हा दर वेगाने घसरत आहे. 

सध्या मृत्यूदर 2.23 टक्के इतका  आहे.  1 एप्रिल 2020 पासून तो सर्वात कमी आहे.

केवळ  मृत्यूदर कमी झाला असे नाही, तर प्रभावी नियंत्रण धोरण, जास्तीत जास्त चाचण्या आणि एकूण देखभालीसाठी प्रमाणित क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलमुळे सलग सहाव्या दिवशी प्रतिदिन 30,000  रुग्ण बरे झाले आहेत. 

बरे झालेल्या रुग्णांची संख्या जलदगतीने 10 लाखांच्या जवळ जात आहे. गेल्या 24 तासांत 35,286  रुग्णांना सुट्टी मिळाल्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9,88,029 एवढी झाली आहे. कोविड-19 रुग्णांच्या बरे होण्याच्या दरात वाढ होऊन आता तो 64.51 टक्के एवढा झाला आहे.

रुग्ण बरे होण्याच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे, त्यामुळे बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय कोविड-19 रुग्ण यातील अंतर वाढत आहे, तो सध्या 4,78,582 आहे. वैद्यकीय निरीक्षणाखाली असलेल्या सक्रीय रुग्णांची संख्या 5,09,447 एवढी आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *