मॅजिक संस्थेच्या ‘डिस्कवर मॅजिक’ या त्रेमासीक न्युजलेटरचे सीएमआयए पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन

औरंगाबाद ,४ जुलै  /प्रतिनिधी :-मराठवाडा तसेच देशपातळीवर टियर 2 आणि 3 शहरांमध्ये नाविन्यपूर्ण नवउद्योजक घडवण्यासाठी कार्यरत असलेल्या मॅजिक संस्थेच्या उपक्रमाचा तसेच स्टार्टअप इकोसिस्टिममधील माहितीचा आढावा घेणारे डिस्कवर मॅजिक’ या त्रेमासिक न्युजलेटरचे शनिवार, दि. २ जुलै २०२२ रोजी सीएमआयए नवनियुक्त पदाधिकारी अध्यक्ष नितिन गुप्ता, उपाध्यक्ष दुष्यंत पाटील, मानद सचिव अर्पित सावे, मानद सह-सचिव सौरभ भोगले, मानद कोषाध्यक्ष उत्सव माच्छर-, मानद सहकोषाध्यक्ष अथर्वेशराज नंदावत आणि माजी अध्यक्ष शिवप्रसाद जाजू यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.

डिस्कवर मॅजिक न्यूजलेटरच्या या चौथ्या आवृत्तीत एप्रिल 2022 ते जुन 2022 काळातील मॅजिकच्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे, यात प्रामुख्याने इनोव्हेट फॉर इंडिया या स्टार्टअप्स करिता आयोजित राष्ट्रीय इनोव्हेशन स्पर्धेबद्दल माहिती, ‘स्टार्टअप फॉर रेल्वेज’ उपक्रम, सुप्रिया सुळे, राजेश टोपे यांनी साधलेला स्टार्टअप डायलॉग, दीपक घैसास, गिरीश चितळे यांनी केलेले मार्गदर्शन, स्टार्टअप इकोसिस्टिममधील विविध मान्यवरांनी मॅजिकला दिलेली भेट, मॅजिक इंटरव्ह्यू सिरीज, मेंटरिंग क्लिनिक या नियमित उपक्रमाचा तपशील देण्यात आला आहे. या त्रैमासिकाच्या माध्यमातून मॅजिकद्वारे घेतले जाणाऱ्या विविध उपक्रमाची सविस्तर माहिती स्टार्टअप इकोसिस्टीमपर्यंत नियमितपणे पोहचवली जात असते.

या कार्यक्रमाप्रसंगी सीएमआयएचे वरिष्ठ पदाधिकारी, मॅजिकचे संचालक आशिष गर्दे, प्रसाद कोकीळ, रितेश मिश्रा, सुरेश तोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

हे त्रेमासिक https://bit.ly/DiscoverMAGIC4 या संकेस्थळावर उपस्थित असल्याची माहिती मॅजिकच्या वतीने देण्यात आली आहे.