फडणवीस-शिंदे सरकारकडून बहुमताचा आकडा पार!सोमवारची बहुमत चाचणी ही निव्वळ औपचारिकताच

मुंबई : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बहुमताचा आकडा गाठलाय हे सिद्ध झालंय. सोमवारची बहुमत चाचणी ही निव्वळ औपचारिकताच राहिली आहे. रविवारी झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे – फडणवीस यांनी उभे केलेले अध्यक्षपदाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना १६४ मते मिळाली आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना फक्त १०७ मतेच पडली. यावरून फडणवीस – शिंदे सरकार बहुमताचा आकडा सहज पार करणार हे यावरून सिद्ध होते आहे.
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. त्यानुसार ३ आणि ४ जुलै रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि दुसऱ्या दिवशी सरकारची बहुमताची चाचणी होणार आहे.