विभागातील उद्योगक्षेत्र आणि पायाभूत सुविधांच्या विकासाकरिता प्रयत्न करणार : सीएमआयए नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन गुप्ता

औरंगाबाद ,३ जुलै  /प्रतिनिधी :-सीएमआयए संस्थेला पाच दशकापेक्षा अधिक काळापासून मराठवाडा विभागातील उद्योग वाढीकरिता नेहमी पुढाकार घेत आहे, अश्या मोठा इतिहास असलेल्या चेंबरचा पुढच्या पिढीतील अध्यक्ष म्हणून माझावर आणि माझा संपूर्ण टीमवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. विभागात नवनवीन उद्योगिक गुंतवणुक आकर्षित करण्यासाठी, पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे मत सीएमआयए नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी व्यक्त केले. शनिवार दि. २ जुलै २०२१ रोजी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर सीएमआयएच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सीएमआयएच्या २०२२-२३ या वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीची निवड झाली त्याप्रसंगी ते बोलत होते.

 दुष्यंत पाटील- उपाध्यक्ष



सीएमआयएच्या २०२२-२३ वर्षाच्या कार्यकारिणीमध्ये नितिन गुप्ता,यांची अध्यक्ष म्हणून,  दुष्यंत पाटील- उपाध्यक्ष, अर्पित सावे-मानद सचि,. सौरभ भोगले- मानद सह-सचिव, उत्सव माच्छर-मानद कोषाध्यक्ष, अथरवेशराज नंदावत -मानद सहकोषाध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली.

अर्पित सावे

नवनिर्वाचित मानद सचिव अर्पित सावे म्हणाले , मला आणि युवा नेतृत्व संघाला मिळालेल्या या संधीबद्दल मी कृतज्ञ आहे. आगामी काळात आम्ही मराठवाड्यात मोठे उद्योगाच्या गुंतवणुकीसाठी आणि त्याचबरोबर एमएसएमईंना चालना देणार्‍या उद्योगांसाठी प्रयत्न करण्याची आमचा मानस आहे.  सरकारच्या “लोकल फॉर ग्लोबल” चा उपक्रमासाठी, निर्यातीला चालना देण्याच्या प्रयत्नांचे नेतृत्व सीएमआयए संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

सौरभ भोगले- मानद सह-सचिव

कार्यक्रमाच्या सुरवातीला सीएमआयए संस्थेचे माजी अध्यक्ष  शिवप्रसाद जाजू यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. नितिन गुप्ता, आणि वर्ष २०२२-२३ साठी नवनिर्वाचित पदाधिका-यांचे स्वागत केले. यावेळेस बोलताना श्री. शिवप्रसाद जाजू म्हणाले की  कोव्हीड -१९ साथरोगाच्या प्रभावातून सावरतांना उद्योगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, चेंबरच्या माध्यमातून उद्योग जगताला सर्वोतोपरी मदत करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. सीएमआयए सदस्यांनी गेल्या वर्षभरात चेंबरच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल कार्यकारिणी तसेच सदस्याचे त्यांनी आभार मानले.

उत्सव माच्छर-मानद कोषाध्यक्ष
अथरवेशराज नंदावत

माजी मानद सचिव सतिश लोणीकर  यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तसेच अर्पित सावे यांनी आभार प्रदर्शन केले.  या कार्यक्रमासाठी सीएमआयएचे माजी अध्यक्ष श्री एन के गुप्ता, श्री सी पी त्रिपाठी, श्री राम भोगले, कमांडर अनिल सावे, श्री सुरेश बापना श्री उमेश दाशरथी, श्री. मुनीश शर्मा, श्री आशिष गर्दे, श्री गुरप्रीत बग्गा, श्री प्रसाद कोकीळ, श्री कमलेश धूत, उद्योजक श्री रवि माछर, श्री अजित मुळे आणि ईसी सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होते.

शनिवार दि. २ जुलै २०२१ रोजी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर सीएमआयएच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सीएमआयएच्या २०२२-२३ या वर्षासाठीच्या नवीन कार्यकारीणीची  निवड झाली.

२०२२-२३ साठी नवनिर्वाचित पदाधिकारी.

·        श्री. नितिन गुप्ता,अध्यक्ष

·        श्री. दुष्यंत पाटील, उपाध्यक्ष

·        श्री. अर्पित सावे, मानद सचिव

·        श्री. सौरभ भोगले,मानद सह-सचिव

·        श्री. उत्सव माच्छर, मानद कोषाध्यक्ष

·        श्री. अठर्वेशराज नंदावत, मानद सह-कोषाध्यक्ष

·        श्री. शिवप्रसाद जाजू, माजी अध्यक्ष (Immediate Past President)

नवनियुक्त कार्यकारिणी सदस्य

·        श्री. प्रीतीश चटर्जी

·        श्री. सुरेश तोडकर

·        श्री रसदीपसिंग चावला

Co-opted Members 2022-23 | को-ओप्ट कार्यकारिणी सदस्य २०२२-२३

·        श्री. रितेश मिश्रा

·        श्री. रोहन जैन

·        श्रीमती. वर्षा अभय देशमुख

·        श्री. आशिष गाडेकर

·        श्री. सुयोग माच्छर