वैजापूर उपजिल्हा रुग्णालयातील मुख्य परिचारिका शांता भुईंगळ यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात

वैजापूर ,२ जुलै  /प्रतिनिधी :- आरोग्य विभागात 36 वर्षाची प्रदीर्घ रुग्णसेवा  केल्यानंतर येथील उपजिल्हा रुग्णालयातील मुख्य रुग्ण आरोग्य परिसेविका शांताताई सिद्धार्थ भुईगळ  30 जून रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यांचा सेवापूर्ती सोहळा येथील जेतवन बुद्ध विहारात त्यांचा सेवापूर्ती सोहळा शनिवारी (ता.2) विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.  


नगराध्यक्षा शिल्पाताई दिनेशभाऊ परदेशी यांनी प्रथम त्याच्या सेवेचा गौरव करून त्यांच्या प्रदीर्घ सेवेबद्धल त्यांचे कौतुक करून भविष्य आरोग्यदायी राहो म्हणून शुभेच्छा दिल्या तर उपनगराध्यक्ष साबेर खान यांनीही त्यांच्या सेवेचे कौतुक केले. सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत व डॉ.संतोष गंगवाल  यांनी श्रीमती भुईंगळ यांनी कोरोना काळात स्वतः चा जीव धोक्यात टाकून केलेल्या सेवेचा गुणगौरव केला. 
भाजपा शहर अध्यक्ष दिनेश राजपूत,नगरसेवक   प्रकाश चव्हाण, राजेश गायकवाड ,साहेबराव पडवळ,पत्रकार अमोल राजपूत, मन्सूरअली सैय्यद ,रियाज शेख , विलास म्हस्के, सुनील त्रिभुवन, किरणसिंग राजपूत व धोंडीरामसिंह राजपूत आदींनी त्यांचा सत्कार केला. उपजिल्हा रुग्णालयाचे विजय पाटील, मनीषा गायकवाड व सर्व रुग्ण सेविका यांनी ही सेवा पूर्ती सोहळा निमित्त अभिनंदन केले. नसगरसेविका संगीता राजेश गायकवाड, तसेच बाळासाहेब गायकवाड, मनीष गणवीर, अण्णा ठेंगडे, प्रवीण खाजेकर, रुद्रा शेजवळ, रमेश सोनवणे, जेतवन बुद्ध विहार परिवार, भन्तेजी यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन साहेबराव पडवळ यांनी केले तर प्रास्ताविक सिद्धार्थ भुईगळ यांनी  केले.आभार विलास म्हस्के यांनी मानले