वैजापूर येथे परमवीर चक्र विजेता शहीद अब्दुल हमीद यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

शनिवारी शहरातून राष्ट्रीय एकात्मता रॅली 

वैजापूर ,१ जुलै  /प्रतिनिधी :- 1965 च्या भारत – पाकिस्तान युध्दात खेमकर सेक्टरमध्ये जिवाची पर्वा न करता पाकिस्तानचे सात पॅटन टॅंक उडवून या युध्दात शहीद झालेल्या परमवीर चक्र विजेते अब्दुल हमीद यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (ता.2) वैजापूर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

सैनिक फेडरेशन वैजापूर, शहीद अब्दुल हमीद एकता असोसिएशन महाराष्ट्र यांच्यावतीने परमवीर चक्र विजेता शहीद अब्दुल हमीद जयंती महोत्सव साजरा करण्यात येत असून या निमित्ताने उद्या सायंकाळी 4 वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून राष्ट्रीय एकात्मता रॅली काढण्यात येणार आहे. 

नौगाजीबा फंक्शन हॉल येथे रॅलीचा समारोप होईल. यावेळी सामुहिक प्रतिज्ञा घेण्यात येईल. त्यापूर्वी सकाळी सकाळी वृक्षारोपण व घायगांव येथील श्री.गुरू गणेश गोशाळेतील गायींना चारा वाटपाचा कार्यक्रम होईल. कर्नल सुरेश पाटील हे जयंती महोत्सव कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष असून ब्रिगेडियर सावंत हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रसंगी शहीद अब्दुल हमीद यांचे नातू जमील आलम (उत्तर प्रदेश), वीर चक्र विजेते कचरू येडू साळवे, जेष्ठ समाजसेवक डी.ए. चौगुले, मुश्ताक नाकवाणी,गणेश कदम,हंसराज वादघुले,प्रा.रवी अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जयंती महोत्सव समितीचे राजू पठाण यांनी केले आहे.