वैजापूर येथे कृषी दिनानिमित्त कै.वसंतराव नाईक यांना अभिवादन व शेतकऱ्यांचा गौरव

वैजापूर ,१ जुलै  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती व आधुनिक पद्धतीची शेती करावी व शेती व्यवसायाला जोड धंद्याची जोड देऊन  भरपूर उत्पन्न काढून एक आदर्श महाराष्ट्र समोर ठेवावा असे आवाहन औरंगाबाद येथील कृषी शास्त्रज्ञ शरद अवचट यांनी कृषिदिनानिमित्त शुक्रवारी येथे आयोजित कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले. 

पंचायत समितीच्या कै.विनायकराव पाटील सभागृहात आयोजित या कार्यक्रमास सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी विजय कासलीवाल, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव व गट विकास अधिकारी कैलास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी तालुक्यातील अधिक उत्पादन काढणारे शेतकरी बाबासाहेब थेटे, अनिल थेटे, प्रल्हाद भागवत,शिवाजी बनकर, विठ्ठल साब्दे, मोती वाघ, वेनूनाथ थेटेद्वारकानाथ ठोंबरे, भगवान इंगळे, विकास शिंदे यांचाकृषी विभागामार्फत गौरव करण्यात आला. कृषी संजीवनी सप्ताह सांगता ही याच दिवशी झाली. प्रथमउपस्थितांनी स्व,वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तालुक्यातील  शेतकरी, कृषी सहाय्यक यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचलन कृषी सहायक रवी उराडे यांनी केले तर आभार एच.आर.बोयणार यांनी मानले,