वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर

आक्षेप फेटाळले ; इच्छुकांचे आरक्षणाकडे लक्ष 

वैजापूर ,३० जून  /प्रतिनिधी :- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर तालुक्यातून दाखल करण्यात आलेल्या 23 आक्षेप व हरकती फेटाळण्यात आल्या असून निवडणूक विभागाकडून अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली आहे. आता आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचनेचा प्रारूप मसुदा तयार करून त्यावर आक्षेप व हरकती मागविल्या होत्या. प्रारूप प्रभाग रचनेवर तालुक्यातून एकूण 23 आक्षेप व हरकती दाखल झाल्या होत्या. या आक्षेप व हरकतीवर 16 जून रोजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पूर्ण होऊन हे सर्व आक्षेप फेटाळण्यात आले असून गट व गणांची परिस्थिती “जैसे थे” राहिली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच आरक्षण प्रक्रिया राबविण्यात येण्याची शक्यता आहे.निवडणूकीसाठी तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद गट व अठरा पंचायत समिती गणाची अंतिम प्रभाग रचना जाहीर  करण्यात आली असून नवीन प्रभाग रचनेनुसार तालुक्यात एक गट व दोन गणांची भर पडली आहे. या प्रभाग रचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होईल असे निवडणूक विभागातील सूत्रानी सांगितले. 
पुर्वी तालुक्यात जिल्हा परिषदेचे 8 गट व पंचायत समितीचे 16 गण होते.आता त्यांची एकूण संख्या 9 जिल्हा परिषद गट व 18 पंचायत समिती गण अशी झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या गट व गणांतील गावांचे मोठ्याप्रमाणात फेरबदल झाले आहे.ग्रामीण भागाचे विकास केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे.यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेचा  कामकाजाचे सूत्र प्रशासकांच्या हाती सोपविण्यात आले आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीसाठी ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण धोरण निश्चित होत नसल्यामुळे निवडणूक प्रक्रियेला विलंब झाला होता. निवडणूक विभागाने जिल्हा परिषद गटाचा प्रसिद्ध केलेला प्रारुप प्रभाग रचना आराखडा 2011 च्या लोकसंख्येनुसार तयार केला आहे. अंतिम प्रभाग रचनेनुसार गट व गण व त्यातील गांवे अशी –

जिल्हा परिषद गट (9)
 १) वाकला  २) धोंदलगाव ३) शिऊर ४) खंडाळा ५) सवंदगाव ६) लासूरगाव  ७) लाडगाव   ८) चोरवाघलगाव  ९) महालगाव    

पंचायत समिती गण (18) 

१) पोखरी २) वाकला  ३) धोंदलगाव ४) बाभुळगाव बु.  ५) शिऊर  ६) पाराळा  ७) बोरसर  ८) खंडाळा ९)बिलोणी  १०) सवंदगाव  ११)पालखेड १२)लासूरगाव १३) घायगाव १४)लाडगाव १५ वाजंरगाव १६)चोरवाघलगाव १७)नागमठाण १८) महालगाव 
जिल्हा परिषद गटातील प्रभागाना अंतिम मान्यता. 
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचा अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. गट व गण रचनते फेरबदल झाल्यामुळे  निवडणूक ल़ढवणा-या काही प्रस्थापित लोकप्रतिनिधीना हा बदल राजकीय वाटचालीसाठी अवघड ठरणार असल्याची चर्चा होत आहे. निवडणूक लढवण्यासाठी तयारी केलेल्या नवख्या मंडळीने विजय किंवा पराभव या दृष्टीने निवडणूक लढवण्याची तयारी केलेली आहे. 
अंतिम प्रभाग रचना.. 
जिल्हा परिषद गटाचे नाव, एकूण लोकसंख्या व  अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती संख्या

१) वाकला 
 अनुसूचित जाती – 3341 अनुसूचित जमाती -1682 एकूण लोकसंख्या – 29 हजार 24
२) धोंदलगाव   अनुसूचित जाती – 3596  अनुसूचित जमाती – 1329  एकूण लोकसंख्या – 28 हजार 875

३) शिऊर  अनुसूचित जाती – 2843 अनुसूचित जमाती – 2845 एकूण एकूण लोकसंख्या – 31 हजार 648
४) खंडाळा  अनुसूचित जाती – 4552अनुसूचित जमाती – 1552एकूण लोकसंख्या – 28 हजार 133
५) सवंदगाव अनुसूचित जाती – 4533अनुसूचित जमाती – 2543एकूण लोकसंख्या – 31 हजार 675
६) लासूरगाव अनुसूचित जाती – 3269अनुसूचित जमाती – 1342एकूण लोकसंख्या – 29 हजार 655

७) लाडगाव  अनुसूचित जाती – 4320अनुसूचित जमाती – 1825एकूण लोकसंख्या – 39 हजार 810
८) चोरवाघलगाव अनुसूचित जाती –3671अनुसूचित जमाती – 2171एकूण 29 हजार 966
९) महालगावअनुसूचित जाती – 5599अनुसूचित जमाती – 2218एकूण लोकसंख्या – 30 हजार 289
एकूण गावे- -165
ग्रामपंचायत संख्या -135
एकूण लोकसंख्या – 2 लाख 29 हजार 75
 अनुसूचित जाती – 35 हजार 634
अनुसूचित जमाती – 17 हजार 437
निवडणूक विभागाची तयारी – नायब तहसीलदार  महेंद्र गिरगेवैजापूर तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद व अठरा पंचायत समिती गणांची अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जाहीर झाली आहे.निवडणूकीच्यादृष्टीने विभागाची तयारी सुरु असल्याची माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार महेंद्र गिरगे यांनी दिली.