शिंदे मुंबईत येणार! पोलिसांनी काढल्या सर्वच पक्षांना नोटीस

मुंबई : एकनाथ शिंदे समर्थक आमदार उद्या मुंबईमध्ये येणार आहेत. यामुळे मुंबई पोलीस देखील सतर्क झाली असून पोलिसांनी राजकीय पक्षांना नोटिसा पाठवल्या आहेत. मुंबईतील वातावरण बिघडू नये, यासाठी हि नोटीस काढली आहे. गुरुवारी एकनाथ शिंदे गटातील आमदार मुंबईतील विधानभवनात उपस्थित राहणार आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये. म्हणून मुंबई पोलिस ऍक्टिव्ह मोड मध्ये आलेली बघायला मिळत आहे.
                  
मुंबई पोलिसांनी एकनाथ शिंदे गट उद्या मुंबईत येणार असल्याच्या वृत्तामुळे, मुंबई पोलीस सतर्क झाली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, भाजप, सपा या पक्षांच्या नेत्यांना नोटिसा पाठवल्या असून, भडकवणारी वक्तव्ये करू नका किंवा आक्षेपार्ह पोस्ट करू नका. परिस्थिती बिघडल्यास मुंबई पोलिस कडक कारवाई करेल, असे या नोटीस मध्ये म्हटले आहे.
 गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील आमदार राज्याच्या बाहेर आहेत. गुरुवारी मुंबईतील विधानभवनात बहुमत चाचणीसाठी विशेष अधिवेशन घेतलं जाणार आहे. यावेळी एकनाथ शिंदे गटातील आमदार गुरुवारी मुंबई येणार आहे. यावेळी विरोधी पक्षांकडून वातावरण बिघडेल असे कोणतेही कृत्य घडू नये, म्हणून मुंबई पोलीस तयारीत असल्याची बघायला मिळत आहे.

राज्यपालांनी गुरुवारी बहुमत चाचणीसाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या बहुमत चाचणीसाठी बंडखोर आमदार उद्या मुंबईमध्ये पोहोचणार आहे. त्यांचा सुरक्षेसाठी केंद्र सरकारने दोन हजार जवान मुंबईत दाखल झाले आहेत.

बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेना ठिकठिकाणी आक्रमक झाल्याची दिसत असल्याने केंद्राने हा निर्णय घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार हे गुवाहाटीवरुन आज गोव्याला पोहोचणार आहेत. त्यानंतर उद्या हे सर्व आमदार मुंबईत पोहोचणार आहेत. सुरक्षेसाठी केंद्र सरकारने सीआरपीएफच्या तब्बल दोन हजार जवानांची तूकडी मुंबईत दाखल झाली आहे.