बंडखोर आमदारांना सुरक्षा पुरवण्यासाठी राज्यपालांचे पोलिस महासंचालकांना पत्र

आ.बोरणारे यांच्या घर व कार्यालयाला “सी.आर.एफ.सुरक्षा

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात शिवसैनिक आक्रमक झाले असून अनेक कार्यकर्ते हे आता रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. यामध्येच सेनेच्या अनेक बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त आणि महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक यांना पत्र लिहिले आहे.

यामध्ये सर्व आमदारांना सुरक्षा द्यावी, असे पत्रात म्हटले आहे. याशिवाय आमदारांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही तैनात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

याप्रकरणी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी पत्र लिहिण्यापूर्वी केंद्र सरकारनेही मोठा निर्णय घेतला होता. शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवली जाणार आहे. आज सायंकाळपर्यंत सर्व आमदारांच्या घरी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत. या आमदारांना Y+ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.

आ.बोरणारे यांच्या घर व कार्यालयाला “सी.आर.एफ.सुरक्षा

वैजापूर ,२६ जून  /प्रतिनिधी :-
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय भूकंप होत असताना असताना शिवसेनेत पडलेल्या फुटी मुळे ठाकरे समर्थक व शिंदे समर्थक असे दोन गट निर्माण झाले आहे.ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही आमदारांच्या कार्यालयावर ठाकरे समर्थकांनी काल हल्ला बोल करत तोड फोड केली.ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे.यामध्ये राज्य सरकारची यंत्रणा निकामी ठरत असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आता केंद्राने हस्तक्षेप करत सी.आर.पी.एफ चे जवान आमदारांच्या कार्यालय व घरांच्या सुरक्षेकरिता तैनात केले आहे.ज्यामध्ये वैजापूरचे शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या घरी आज सकाळी जवान तैनात करण्यात आले आहे.सोशल मीडिया वर दुसऱ्या फळीतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल्याने आमदार बोरनारे यांच्या वर टीका टिपण्या होत असल्याने बोरनारे यांच्या कुटुंबियांवर तसेच कार्यालयावर हल्ला होण्याची दाट शक्यता  वर्तवली जात होती ज्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा फौजफाटा रविवारी सकाळीच्या सुमारास बोरनारे यांच्या घरी व कार्यालयालगत लावण्यात आला. आमदार गुवाहाटीमध्ये तर संरक्षण त्यांच्या कुटुंबाला त्यामुळे वैजापूरच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क बोलले जात आहे