संत रविदास वसतिगृहात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

वैजापूर ,२६ जून  /प्रतिनिधी :- सामाजिक न्यायाचे प्रणेते,आरक्षणाचे जनक व शिक्षण क्रांतीचे दूत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना त्यांच्या जयंती निमित्त रविवारी येथील मदर तेरेसा मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहात व संत रविदास महाराज मागास वर्गीय वस्तीगृहातील मुला-मुलींना शैक्षणिक साहित्य वाटून व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव करून अभिवादन करण्यात आले.

शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे मूळ आहे,शिक्षणाशिवाय व्यक्ती विकास शक्य नाही ,म्हणुन छत्रपती शाहू महाराजांनी आरंभ केलेली शिक्षण गंगाघराघरात पोहचविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत असे माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांनी सांगितले.आय.एस शिंदे यांनीही शिक्षण  घेण्यासाठी  विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची  पराकाष्ठा करावी असे आवाहन केले. आरंभी सर्व उपस्थितांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार टाकून अभिवादन केले .या प्रसंगी बाळासाहेब गायकवाड, मोती वाघ, विलास म्हस्के, रुद्रा शेजवळनामदेव त्रिभुवन, बाबासाहेब त्रिभुवन, यशवंत पडवळ,शिवा थोरात, यांच्यासह पालक काशीनाथ सोळसे, श्रीमती पडवळ,श्रीमती त्रिभुवन, सुरेखा ठेंगडे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रम प्रास्ताविक अण्णासाहेब ठेंगडे तर सूत्र संचलन सूचित कांबळे यांनी केले तर आभार निखिल ठेंगडे यांनी मानले.  गुणवंत विद्यार्थी रिया सोळसे दहावीत सर्व प्रथम, द्वितीय रिया पडवळ यांचा गुण गौरव तसेच अनिकेत वाळके, साक्षी त्रिभुवन, वर्षा त्रिभुवन, संजय गुप्ता, विशाल गायकवाड, संकल्प पडवळ, राहुल निकम, करण निकम, दीक्षा त्रिभुवन यांना शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले