परभणी जिल्ह्यात 30 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

परभणी, दि.28 :- जिल्ह्यात मंगळवार दि.28 जुलै 2020 रोजी 11 व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून आज रोजी एकूण 30 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

परभणी शहरातील एकनाथ नगर, गणेश नगर, वर्मा नगर आणि जागृती कॉलनीतील एकूण 8 तसेच मानवत शहरातील मेन रोडवरील एकूण 3 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. परभणी शहरातील लोकमान्य नगर, काद्राबाद प्लॉट, नांदखेडा रोड, धार रोड, बाबु गेणू रोड, राजेंद्र गिरी नगर, मोमिनपुरा, अजिंठा नगर हडको, मदिना कॉलनी, वडवल्ली, राठोड गल्ली येथे एकूण बारा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

परभणी ग्रामीण भागात पिंगळी, वरपुड, माळसोन्ना येथे एकूण 3 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. पूर्णा शहरात शास्त्रीनगर, रेल्वे वसाहत, आनंदनगर या भागात एकूण तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. गंगाखेड शहरातील दिलकश नगर, नगरेश्वर गल्ली, नवामोंढा आणि तारू मोहल्ला येथे एकूण 4 जण तर तालुक्यात ढोलकेवाडी येथे 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सेलु शहरात सेलु शहरात पारीख कॉलनी व मारोती नगर येथे एकूण 4 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.

आज रोजी परभणी शहरातील मोमिनपुरा येथील 88 वर्षीय रहिवाशी असलेल्या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाला असून या महिलेस उच्च रक्तदाब व हृदयाचा आजार होता. असेही कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *