नांदेड जिल्ह्यात 134 व्यक्तींचे अहवाल बाधित

नांदेड दि. 28 :- जिल्ह्यात आज 28 जुलै रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 30 व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 134 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 284 अहवालापैकी 89 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 1 हजार 528 एवढी झाली असून यातील 770 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 677 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 11 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 5 महिला व 6 पुरुषांचा समावेश आहे.

गुरुवार 23 जुलै रोजी वजिराबाद नांदेड येथील 71 वर्षाची एका महिलेचा खाजगी रुग्णालयात तर सोमवार 27 जुलै रोजी जुना कौठा नांदेड येथील 50 वर्षाचा एक पुरुष, सिडको नांदेड येथील 68 वर्षाचा एक पुरुष, मुदखेड येथील 70 वर्षाची एक महिला, किनवट मोमीनपुरा येथील 70 वर्षाची एक महिला, बिलोली तालुक्यातील कासराळी येथील 80 वर्षाचा एक पुरुष, तर मंगळवार 28 जुलै रोजी नांदेड नवीन मोंढा येथील 63 वर्षाचा एक पुरुष, भोकर रिठा येथील 57 वर्षाचा एक पुरुष, देगलूर येथील 65 वर्षाच्या एका महिलेचा डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथे तर नांदेड कुंभार गल्ली वजीराबाद येथील 74 वर्षाचा एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत पावला. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 70 एवढी झाली आहे.

आज बरे झालेल्या 30 बाधितांमध्ये पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 21, लोहा कोविड केअर सेंटर येथील 7 तर औरंगाबाद येथे संदर्भित झालेल्या 2 बाधितांचा समावेश आहे. आतापर्यंत एकुण 770 बाधित व्यक्तींना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे.जिल्ह्यात 677 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती घेतलेले स्वॅब- 12 हजार 940,निगेटिव्ह स्वॅब- 10 हजार 240,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 134,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 हजार 528,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 50,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 8,मृत्यू संख्या- 70,रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 770,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 677,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 264.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *