महाराष्ट्राला जीएसटी परताव्यापोटी १९ हजार २३३ कोटींचा निधी

राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना जीएसटी भरपाई म्हणून 1,65,302 कोटी

नवी दिल्ली, 27 : आर्थिक वर्ष २०१९-२० च्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) परताव्याचा महाराष्ट्राच्या वाट्याचा १९ हजार २३३ कोटी रुपयांचा निधी आज केंद्र शासनाने जारी केला.

केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज देशातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांना आर्थिक वर्ष २०१९-२०च्या जीएसटी परताव्याचा  १ लाख ६५ हजार ३०२ कोटी रूपयांचा निधी जारी केला आहे.  याच कालावधीत देशात उपकरापोटी ९५ हजार ४४४ कोटींचा निधी संकलित झाला आहे.

देशातील एकूण ३१ राज्य व केंद्रशासित प्रदेशांना जारी करण्यात आलेल्या जीएसटी परताव्याच्या एकूण रकमेपैकी महाराष्ट्राच्या वाट्याचा १९ हजार २३३ कोटींचा निधीही जारी करण्यात आला आहे. केंद्राने यावर्षी मार्च महिन्यात जीएसटी परताव्यापोटी राज्य व केद्रशासित प्रदेशांना १३ हजार ८०६ कोटी रूपयांचा निधी जारी केला आहे.

केंद्र सरकारने नुकतेच मार्च 2020 मध्ये जीएसटी भरपाई म्हणून 13,806 कोटी रुपये जारी केले आहेत. या रकमेसह, राज्यांना 2019-20 पर्यंतची संपूर्ण नुकसान भरपाई देण्यात आली आहे. वर्ष 2019-20 साठी भरपाईचे एकूण 1,65,302 कोटी रुपये जारी करण्यात आले असून वर्ष 2019-20 दरम्यान 95,444 कोटी रुपयांचा एकूण उपकर भरणा झाला आहे.

2019-20 साठीची भरपाई जारी करण्यासाठी 2017-18 आणि 2018-19 दरम्यान जमा झालेल्या उपकर रकमेचा उपयोग करण्यात आला. याव्यतिरिक्त, केंद्राने 2017-18 संबंधित आयजीएसटीच्या शिल्लक भागासाठीच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून भरपाई निधीला एकत्रित निधीतून 33,412 कोटी रुपये दिले.

आर्थिक वर्ष 2019-20 साठी जारी करण्यात आलेला राज्य निहाय जीएसटी भरपाईच्या माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:-

S.NoName of State/UTGST compensation released to States/Uts for FY 2019-20 (Rs. in Crore)
1Andhra Pradesh3028
2Arunachal Pradesh0
3Assam1284
4Bihar5464
5Chattisgarh4521
6Delhi8424
7Goa1093
8Gujarat14801
9Haryana6617
10Himachal Pradesh2477
11J & K3281
12Jharkhand2219
13Karnataka18628
14Kerala8111
15Madhya Pradesh6538
16Maharashtra19233
17Manipur0
18Meghalaya157
19Mizoram0
20Nagaland0
21Odisha5122
22Puducherry1057
23Punjab12187
24Rajasthan6710
25Sikkim0
26Tamil Nadu12305
27Telangana3054
28Tripura293
29Uttar Pradesh9123
30Uttarakhand3375
31West Bengal6200
 Total165302

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *