वैजापूर तालुक्यातील दहावी – बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

वैजापूर ,२३ जून  /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील विविध महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, यशाची गुरुकिल्ली पुस्तक, एक रोपटे व बुके देऊन त्यांचा शिवसेना व जे.के.जाधव मित्रमंडळातर्फे गुरुवारी सत्कार करण्यात आला. 

येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे.के.जाधव होते. नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, मा.नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी, उपतालुकाप्रमुख डॉ.संतोष गंगवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ, सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत, युवासेनेचे आमेर अली, गटशिक्षणाधिकारी हेमंत उशीर, तालुका आरोग्य अधिकारी गुरुनाथ इंदूरीकर, कृषीअधिकारी एच.आर.बोयनर यांची प्रमुख उपस्थिती होती.     

सर्व प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना एक हजार रुपयांचे बक्षीस ही यावेळी देण्यात आले तसेच त्यांना एक रोपटे देऊन पांच रोपटी त्यांनी लावावी असा आग्रह करण्यात आला. 
सुरुवातीला सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.प्रास्ताविक प्राचार्य ए.आर.भिंगारदेव यांनी केले. सूत्र संचलन धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले. आभार राजमाता जिजाऊ इंग्लिश विद्यालयाचे प्राचार्य भुजाडे यांनी केले. कार्यक्रमास शिरीष चव्हाण, पंकज साळुंके, मंगेश भागवत, उप प्राचार्य सुनील कोतकर,एस.एन. सय्यद, प्रा.एम.डी.पठारे आदींची उपस्थिती होती.  पाहुण्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना जीवनातील उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे आवाहन करून पालकांनी अपल्या पाल्याकडे अधिकचे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले.