आघाडीतून बाहेर पडा, एकनाथ शिंदेंचे सूचक ट्वीट

मुंबई : सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड पुकारला आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. गेल्या दोन दिवसांपासून बंडखोर म्हणून चर्चेत आलेल्या एकनाथ शिंदेनी अगदी सूचक ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी चार मुद्द्यांमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत.

१. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला, आणि शिवसैनिक भरडला गेला.

२. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

३. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.

४. तर चौथ्या मुद्द्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे असल्याच्या थेट मत व्यक्त केले आहे.