ठाकरे सरकार कोसळणार? : एकनाथ शिंदेसह 28 आमदार नाराज! महाविकास आघाडी सरकार अडचणीत

मुंबई,२१ जून  /प्रतिनिधी :- शिवसेना नेते,राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही काळापासून शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीतील सेनेला मिळालेल्या विजयानंतरही शिंदेनी माध्यमांसमोर येण्याचे टाळले. काल पहाटेपासून गायब असलेले एकनाथ शिंदे १३ आमदारांसह गुजरातमधील सुरत येथे हॉटेल ली-मेरिडिअन मध्ये मुक्कामाला आहेत. एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अग्रस्थानी होते. तसेच माविआ सरकारला त्यांचा विरोध असल्याचेही बोलले जाते.
 
राज्यसभेच्या पाठोपाठ विधानपरिषदेत भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत केले आहे. या निवडणुकीत शिवसेनासह मित्रपक्षांची तब्बल १२ मते फुटली. शिवसेनेकडे स्वपकीय ५५ आमदारांचे बलाबल असूनही सचिन अहिर व आमशा पाडवी यांना प्रत्येकी २६ मते म्हणजेच एकूण ५२ मते मिळाली. त्यामुळे शिवसेनेची ३ मते फुटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. एकनाथ शिंदे गायब असल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने शिवसेना खासदारांची बैठक बोलावली असून शिवसेना आमदारांना व नेत्यांना माध्यमांशी संवाद न साधण्याचे आदेश दिला आहे. दुपारी १२ वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्प्ष्ट करण्याची शक्यता आहे. शिंदे नेमकी काय भूमिका घेतात, ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतात कि आणखी काही निर्णय घेतात, हे महत्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेतील फुटलेल्या आमदारांची संपूर्ण यादी!

मुंबई : एकनाथ शिंदेसह आमदारांचा मोठा गटच गुजरातला गेल्याने मोठा राजकीय भूकंप झाला आहे. ठाकरे सरकार कोसळणार असल्याचे चित्र मध्यरात्रीपासून स्पष्ट झाले आहे. यातच आता फुटलेल्या आमदारांची यादीच बाहेर आली आहे. शिवसेनेतील मोठा गट बाहेर पडला तर पक्षांतर्गत बंदी कायदाही लागू होणार नाही. त्यामुळे शिवसेना पक्षश्रेष्ठींसह महाविकास आघाडीच्या गोटात प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे.

शिवसेनेतून फुटलेले संभाव्य आमदार
भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेश शिंदे, महेंद्र थोरवे, विश्वनाथ भोईर, संजय राठोड, डॉ.बालाजी किणीकर, शहाजी बापू पाटील, मंत्री भुमरे आणि आमदार राजपूत, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, बालाजी किणीकर, संजय शिरसाट, शांताराम मोरे, महेंद्र दळवी इत्यादी.

SS