आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्वामी विवेकानंद उद्यान, औरंगाबाद येथे योग शिबिर उत्साहात

औरंगाबाद ,२१ जून /प्रतिनिधी :-भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणा-या केंद्रीय संचार ब्यूरो, औरंगाबाद, भारतीय योग संस्थान व योग संवर्धन संस्था औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने 8व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्वामी विवेकानंद उद्यान, टी व्ही सेंटर, औरंगाबाद येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर माजी उपमहापौर, विजय औताडे, तहसिलदार, विजय चव्हाण, योग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष, गोपाल कुलकर्णी, भारतीय योग संस्थानचे उप प्रांत प्रमुख, डॉ उत्तम काळवणे, केंद्रीय संचार ब्यूरो, औरंगाबादचे प्रबंधक, संतोष देशमुख, योग संवर्धन संस्थेचे सचिव श्रीकांत पक्ती, भारतीय योग संस्थानचे जिल्हा प्रधान, संजय औरंगाबादकर, भाऊ सुरडकर, कैलास जाधव, विभागीय मंत्री, अनंत अगरवाल, विभागीय प्रधान, सुरेश शेळके, विजेंद्र काबरा आदी उपस्थित होते. मान्यवरांनी दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

यावेळी विजय औताडे, संतोष देशमुख आणि विजेंद्र काबरा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ उत्तम काळवणे यांनी तर सूत्रसंचालन कैलास जाधव यांनी केले व आभार प्रदर्शन सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार यांनी केले. शांता भोपळे, कविता नावंडे, माधुरी चव्हाण, निर्मला कोकाटे आदिंनी उपस्थितांकडून योग अभ्यास प्रोटोकॉल प्रमाणे करून घेतला.

कार्यक्रमात योग लोगो छापलेल्या टोप्यांचे वितरण करण्यात आले. औरंगाबाद शहरातील भारतीय योग संस्थेचे योग साधक व विविध योग संस्थेतील योग प्रेमी तसेच गरुडझेप करियर अकादमी, ज्ञानज्योत करिअर पॉइंट, पोलिसभर्ती पुर्व प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद यांचे  विद्यार्थी या योग शिबिरात मोठ्या संखेने सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला योग प्रार्थना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमानंतर भारत माता की जय, वंदे मातरम व योगच्या घोषणांनी परिसर दणाणला होता.

योग शिबिराच्या यशस्विते करिता केंद्रीय संचार ब्यूरो चे प्रदीप पवार, प्रिती पवार, राहुल मोहोड आणि प्रभात कुमार व भारतीय योग संस्थान व योग संवर्धन संस्था औरंगाबादचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विक्रमसिंग पवार आदिनी परिश्रम घेतले.