यंदाचा योग दिन यशस्वी करण्याचे आणि योग अधिक लोकप्रिय करण्याचे पंतप्रधानांचे जनतेला आवाहन

नवी दिल्ली:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला यंदाचा योग दिन यशस्वी करण्याचे आणि योग अधिक लोकप्रिय करण्याचे आवाहन केले आहे.

ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“उद्या दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे.  यंदाच्या योग दिनाची संकल्पना ‘मानवतेसाठी योग’ ,ही आहे, चला योग दिन यशस्वीपणे साजरा करत, त्याचाअधिकाधिक प्रसार करूया.”

 ”21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. योग हा आपल्या जीवनाच्या नित्याचा भाग बनवताना त्याचबरोबर आपण योग दिनाचा भरपूर प्रचार करावा असे मला वाटते. यामुळे, आपण कोट्यवधी लोकांना दिशा दाखवू शकता. मला संपूर्ण भरवसा आहे की आपण सर्व याच निष्ठेने खेळाच्या मैदानात उतराल. आणि आपल्या देशाचा गौरव वाढवाल.”असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले