स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त औरंगाबाद मध्ये 75 ठिकाणी योग शिबिराचे आयोजन करून योग दिन साजरा केला जाईल – डॉ भागवत कराड

औरंगाबाद – भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणा-या केंद्रीय संचार ब्यूरो, औरंगाबाद, योग संवर्धन संस्था व भारतीय योग संस्थान, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने भानुदास चव्हाण सभागृह प्रांगण येथे आयोजित योग दिंडी (रैली) उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, डॉ. भागवत कराड यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त औरंगाबाद मध्ये 75 ठिकाणी योग शिबिराचे आयोजन करून योग दिन साजरा केला जाईल अशी माहिती दिली. 

यावेळी व्यासपीठावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, डॉ. भागवत कराड , माजी महापौर, नंदकुमार घोडेले, माजी नगरसेवक, दिलीप थोरात, उपजिल्हाधिकारी, अंजली धानोरकर, योग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष, गोपाल कुलकर्णी, कार्याध्यक्ष, डॉ. चारुलता रोजेकर, भारतीय योग संस्थानचे उप प्रांत प्रमुख, डॉ उत्तम कालवणे केंद्रीय संचार ब्यूरो, औरंगाबादचे प्रबंधक, संतोष देशमुख, योग संवर्धन संस्थेचे सचिव श्रीकांत पक्ती आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले योगचा मानवी शरीरावर खुप चांगला फायदा होतो हे मी डॉक्टर या नात्याने जाणुन आहे व योग साठी औरंगाबाद मध्ये लागेल ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी नंदकुमार घोडेले, अंजली धानोरकर, संतोष देशमुख व डॉ. चारुलता रोजेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली आयाचित व आभार प्रदर्शन उत्तम काळवणे यांनी केले.

यावेळी उद्घाटनाच्या कार्यक्रमात व योग दिंडी (रैली) त कृष्णा ग्रुप महिला च्या महिला, अरविंद लोखंडे यांच्या विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिक केले. योग प्रात्यक्षिक केलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीय संचार ब्यूरो, औरंगाबाद तर्फे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. यावेळी कार्यक्रमात योग लोगो छापलेल्या टोप्यांचे वितरण करण्यात आले.

यावेळी औरंगाबाद शहरातील विविध योग संस्थेतील योग प्रेमी तसेच स्काउट गाइड चे विद्यार्थी, नेहरू युवा केंद्र औरंगाबादचे स्वयंसेवक या योग दिंडीत मोठ्या संखेने शामिल झाले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवदर्शन सांस्कृतिक संच, औरंगाबाद यांच्या पथनातट्याचे आयोजन करण्यात आले होते व त्यानंतर योग प्रार्थना घेउन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. योग दिंडी (रैली) त भारत माता की जय, योग च्या घोषणानी परिसर दणाणला होता.

योग दिंडी (रैली) च्या यशस्विते करिता सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदप पवार, कार्यालय सहा. प्रिती पवार, राहुल मोहोड आणि प्रभात कुमार योग संवर्धन संस्था व भारतीय योग संस्थान, औरंगाबादच्या पदाधिकारी व् कार्यकर्ते आदिनी परिश्रम घेतले.