वैजापूर तालुक्यात दहावी परीक्षेत मुलींनीच मारली बाजी ; सर्वच विद्यालयात मुली प्रथम

वैजापूर ,१८ जून  /प्रतिनिधी :– राज्यात प्रथम येण्यात मुलींनी बाजी मारली त्याची पुनरावृत्ती वैजापूरातील सर्व विद्यालयात मुलीनी बाजी मारून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.

येथील न्यू हायस्कुल मध्ये प्रथम प्रतीक्षा निवृत्ती चन्ने ९८ टक्के, द्वितीय अनुजा संतोष मगर ९५.८० टक्के,, तृतीय अर्पिता उमेश त्रिभुवन ९५.४० टक्के, विद्यासागर कन्या प्रशाला खंडाळा ता.वैजापूर प्रथम सारिका रत्नाकर पवार, ९१.४०टक्के, द्वितीय प्राची दत्तात्रय पवार ९० टक्के, तृतीय दिव्या रामेश्वर सूर्यवंशी ८९.२० टक्के, कैलास पाटील माध्यमिक विद्यालय पल्लवी मचिंद्र सोनवणे ९२.८० टक्के, नूतन कन्या विद्या मंदिर प्रथम ज्ञानेश्वरी चौतमल ८७.९० टक्के, संस्कृती टेके ८७ टक्के, , सेंट मोनिका प्रथम आर्यन जालिंदर  बारसे ९२.८० टक्के, द्वितीय गायत्री अनिल राजपूत ९२.४० टक्के, तृतीय स्वरूपा कासार ९१.२० टक्के अपवाद फक्त सेंट मोनिका शाळेतच एक विद्यार्थी आर्यन बारसे प्रथम आहे. या विद्यार्थीनिंच्या यशाबद्दल शालेय समिती अध्यक्ष भगवान तांबे, के.पी. भवरे, उपाध्यक्ष आर. जे. बंड, मुख्याध्यापक व्ही.डी.सोनवणे, पालिकेचे माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत,मुख्याध्यापिका निर्मला कवडे, प्राचार्य किशोर साळुंके, आर.जे,कुंदे. एन.एस.कदम, श्रीमती शिंदे मॅडम यांच्यासह शिक्षक वृंद यांनी या गुणवंतांचे अभिनंदन केले आहे.