वैजापूर तालुक्याचा दहावीचा निकाल 96.61 टक्के ;920 विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण

दहावीचा निकाल ९६.९४ टक्के, राज्यात एकूण १२२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

औरंगाबाद दहावीचा निकाल ९६.३३ टक्के

औरंगाबाद :-राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल  जाहीर झाला आहे. एकूण ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९९.२७ टक्के) तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा (९५.९० टक्के) आहे. यंदा करोना महामारी काळानंतर पहिल्यांदाच झालेली ही दहावीची परीक्षा आहे. मागील वर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या.

दहावी परीक्षेसाठी ९ विभागातून एकूण १५ लाख ८४ हजार नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यातील १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १५ लाख २१ हजार ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.९४ टक्के आहे.नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.९६ टक्के इतकी आहे, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.०६ टक्के आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा १.९० टक्के इतकी जास्त आहे. अशाप्रकारे यावर्षी देखील मुलींनीच बाजी मारली.

राज्यातील एकूण १२ हजार २१० शाळांचा निकाल १०० टक्के

छायचित्र -चंद्रकांत थोटे

राज्यातील २२ हजार ९२१ माध्यमिक शाळांमधून १६ लाख ३८ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यापैकी १२ हजार २१० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.राज्यातील २९ शाळांचा निकाल ० टक्के, तर १२ हजार २१० शाळांचा निकाल १०० टक्के

राज्यातील २९ शाळांचा निकाल ० टक्के लागला आहे. १ ते १० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या एक आहे. पाच शाळांमध्ये १० ते २० टक्के निकाल लागला. ४ शाळांमध्ये २०-३० टक्के निकाल लागला आहे. १८ शाळांमध्ये ३०-४० टक्के, ३८ शाळांचा निकाल ४०-५० टक्के, ४१ शाळांचा निकाल ५०-६० टक्के निकाल, १२३ शाळांचा निकाल ६०-७० टक्के लागला. याशिवाय ७०-८० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या ३२१, ८०-९० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या १३३०, ९०-९९.९९ टक्के निकाल असणाऱ्या शाळांची संख्या ८ हजार ८०१ इतकी आहे. १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या १२ हजार २१० इतकी आहे.

गुणपडताळणी

विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकर व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळामार्फत किंवा शाळांमार्फत अर्ज करायचा आहे. गुणपडताळणीसाठी सोमवार २० जून ते बुधवार २९ जून पर्यंत अर्ज करायचा आहे. छायाप्रतीसाठी सोमवार २० जून ते शनिवार ९ जुलै पर्यंत अर्ज करायचा आहे. शुल्कही ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहे.
१२ वीची पुरवणी परीक्षा २१ जुलैपासून, तर १० वीची २७ जुलैपासून सुरू होणार

१२ वीची पुरवणी परीक्षा २१ जुलैपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा २१ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत असेल. १० वीची पुरवणी परीक्षा २७ जुलैला सुरू होईल. ही परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट या दरम्यान असेल. १२ वीचे अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली आहे, १० वीचे अर्ज २० जूनपासून घेण्यास सुरुवात करणार आहे.

निकालाची वैशिष्ट्ये


परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी (नियमित)- १५ लाख ८४ हजार ७९०
परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी – १५ लाख ६८ हजार ९७७
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी – १५ लाख २१ हजार ००३
एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी – टक्के ९६.९४

दहावीचा एकूण निकाल ९६.९४ टक्के लागला आहे.

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा आहे.

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल ९७.९६ असून विद्यार्थ्यांचा निकाल ९६.०६ आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९४.४०% लागला आहे.

एकूण ६६ विषयांना सुधारित मूल्यमापन करण्यात आले असून त्यामध्ये २६ विषयांचा निकाल १०० % टक्के लागला आहे.

राज्यातील शाळांतून १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी शाळांचा निकाल १०० % लागला आहे.

२०२२ चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च २०२१ च्या निकालाच्या तुलनेत कमी आहे.

खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ५४,३०३ एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ७९.०६% आहे.

विभागनिहाय टक्केवारी

पुणे – ९६.९६
नागपूर – ९७
औरंगाबाद – ९६.३३
मुंबई – ९६.९४
कोल्हापूर – ९८.५०

अमरावती – ९६.८१

नाशिक – ९५.९०
लातूर – ९७.२७
कोकण – ९९.२७
एकूण – ९६.९४


वैजापूर तालुक्याचा दहावीचा निकाल 96.61 टक्के ;920 विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण

वैजापूर:-
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत वैजापूर तालुक्यातील ९६.६१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील ६४ शाळांमधील एकुण चार हजार ३४२ विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली होती. त्यापैकी चार हजार १९५ (९६.६१ टक्के) विद्यार्थी यशस्वी झाले असुन यात एक हजार ९२० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. सुमारे एक हजार ५८१ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी तर ५८३ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली. शिक्षण मंडळाने शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटवर हा निकाल जाहीर केला. 

जिल्हा परिषद (मुलांची) प्रश्नाला या शाळेतुन केवळ दोन विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असुन निकाल शंभर टक्के लागला आहे. जिल्हा परिषद (मुलींची) प्रशाला (८८.८८ टक्के), न्यु हायस्कुल, वैजापूर (९७.३९ टक्के), सेंट मोनिका इंग्लिश स्कुल, उर्दु मुलींची प्रशाला, नुतन कन्या विद्या मंदिर, हल्क-ए- दवानायक उर्दु स्कुल या शहरातील शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. जिल्हा परिषद प्रश्नाला, बोरसर (९७.४० टक्के), जिल्हा परिषद प्रश्नाला, खंडाळा (९२.१० टक्के), विद्यासागर कन्या प्रश्नाला, खंडाळा (९७.१० टक्के), जिल्हा परिषद प्रश्नाला,लासुरगाव (९२.७२ टक्के), जिल्हा परिषद प्रश्नाला, मनुर (९६.९६ टक्के), जिल्हा परिषद प्रश्नाला, परसोडा (९५.५२ टक्के), जिल्हा परिषद प्रश्नाला, शिऊर (९१.४२ टक्के), संत बहिणाबाई कन्या प्रश्नाला, शिऊर (९७.७५ टक्के), जिल्हा परिषद प्रश्नाला, शिवराई (९४.२८ टक्के), जिल्हा परिषद प्रशाला, वाकला (९४.७३ टक्के), जय हिंद प्रश्नाला, बाभुळगाव (१०० टक्के), विनायक विद्यालय, लोणी (खुर्द) (९३.५८ टक्के), पारेश्वर विद्यालय, पालखेड (९८.८५ टक्के), संत जोसेफ माध्यमिक विद्यालय, माळीघोगरगाव (९७.४५ टक्के), न्यु हायस्कुल, धोंदलगाव (९६.७७ टक्के), न्यु हायस्कुल, लाडगांव (९५.७५ टक्के), न्यु हायस्कुल, महालगाव (९६.६६ टक्के), न्यु हायस्कुल, तलवाडा (९४.४४ टक्के), विनायक हायस्कुल, देवडोंगरी, संत जनार्दन स्वामी विद्यालय, टुणकी, न्युज हायस्कुल, चिकटगाव, माध्यमिक विद्यालय, जरुळ, श्रीराम विद्यालय, लाखणी, भैरवनाथ विद्यालय, भटाणा, कदम विद्यालय, बळ्हेगाव, राजे संभाजी माध्यमिक विद्यालय, आघूर, भगिरथी माध्यमिक विद्यालय, नालेगाव, उत्कर्ष विद्यालय, शनि देवगाव, न्युज इंग्लिश स्कुटी भोकरगाव, जय बालाजी आदिवासी आश्रम शाळा, शिऊर, माध्यमिक विद्यालय, डवाळा, डॉ.‌हेडगेवार विद्यालय, सवंदगाव, आयेशा उर्दु हायस्कुल, वैजापूर, अनुसुचित जातीची मुलांची निवासी शाळा, संत जनार्दन विद्यालय, सवंदगाव, दादासाहेब पाटील पब्लिक स्कुल व कैलास पाटील विद्यालय या शाळेचे निकाल शंभर टक्के लागले आहेत.

संचिता योगेश ठोळे

येथील रहिवासी व आई.ई.एस. कात्रप बदलापुर जि. ठाणे येथील शाळेची विद्यार्थिनी संचिता योगेश ठोळे हिने ९५.४० टक्के गुण मिळवून दैदीप्यमान यश संपादन केले. ती येथील जेष्ठ विधिज्ञ ॲड. एस. एस. ठोळे यांची नात आहे. तिच्या या यशाबद्दल रमनलाल बड़जाते, मुकेश काला, योगेश ठोळे, रचना काला, निधि ठोळे, अनया काला, आध्यात्म काला आदींनी अभिनंदन केले आहे.