मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

मुंबई :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.

Image

राजभवन येथे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनीही राज्यपाल श्री. कोश्यारी यांना शुभेच्छा दिल्या.

Image

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांसह विविध मान्यवरांनी राज्यपालांचे अभिष्टचितंन केले. राष्ट्रपतींनी दूरध्वनी करुन तसेच पत्राव्दारे राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.