भाजपतर्फे वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते मोफत बियाणे वाटप

वैजापूर ,१६ जून  /प्रतिनिधी :-भाजपतर्फे तालुक्यातील पांच हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांना  मोफत बियाणे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून आतापर्यंत 2 कोटी रुपयांचे बियाणे वाटप करण्यात आले आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याहस्ते 1081 शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले.पालखेड गणांमध्ये व गावांमध्ये 50 लाखाचे बियाणे वाटप करण्यात आले तसेच वैजापूर तालुक्यामध्ये दोन कोटी रुपयांचे बियाणे वाटप करण्यात आले तर जिल्ह्यामध्ये दोन तीन वर्षांमध्ये 42 हजार शेतकऱ्यांना या मोफत बियाणे चा लाभ देण्यात आला आहे. या बियाण्यांची एकूण किंमत 22 कोटी रुपये एवढी आहे. कराड यांच्यात शेतकऱ्यांच्या हिताचा नेता दिसत असल्याची प्रतिक्रिया युवा मोर्चाचे अनिल वाणी यांनी व्यक्त केली.