नांदेड जिल्ह्यात 70 कोरोनाबाधितांची भर तर दोघाचा मृत्यू

कोरोनातून आज 47 व्यक्ती बरे

नांदेड दि. 27 :- जिल्ह्यात आज 27 जुलै रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 47 व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 70 व्यक्तींचे अहवाल बाधित असून यात 4 बाधित हे शेजारील परभणी जिल्ह्यातील आहेत. आजच्या एकूण 420 अहवालापैकी 337 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 1 हजार 394 एवढी झाली असून यातील 740 एवढे बाधित बरे झाले आहेत. 583 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 12 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 4 महिला व 8 पुरुषांचा समावेश आहे. रविवार 26 जुलै रोजी कौसरनगर चुनाभट्टी परिसर येथील 36 वर्षाची एक महिला व शहापूर देगलूर येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या 59 एवढी झाली आहे.

आज बरे झालेल्या 47 बाधितांमध्ये पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 39, मुखेड कोविड केअर सेंटर मधील 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 5, देगलूर कोविड केअर सेंटर येथील 2 बाधितांचा यात समावेश आहे. आतापर्यंत एकुण 740 बाधित व्यक्तींना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे.जिल्ह्यात 583 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीसर्वेक्षण- 1 लाख 48 हजार 545,घेतलेले स्वॅब- 12 हजार 638,निगेटिव्ह स्वॅब- 10 हजार 151,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 70,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 हजार 394,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 10,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 4,मृत्यू संख्या- 59,रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 740,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 583,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 246.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *