औरंगाबादला दिलासा ,130 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,सहा मृत्यू

जिल्ह्यात 8536 कोरोनामुक्त, 4059 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दि.26 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 377 जणांना (मनपा 316, ग्रामीण 61) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 8536 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 130 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13038 झाली आहे. आजपर्यंत एकूण 443 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4059 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुपारनंतर 84 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 37, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 44 आढळलेले आहेत.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण (37)

मयूर पार्क (4), वाळूज सिडको (2), सिडको महानगर (1), छावणी (1), शेंदूरवादा (1), अन्य (7), तीस ग्रीन स्कीम, पैठण रोड (2), रांजणगाव (4), बीड बायपास (2), बजाज नगर (1), सावंगी (4), सिल्लोड (2), देवळाई (1), शेंद्रा एमआयडीसी (3), एन नऊ प्रताप नगर (2) *मनपा हद्दीतील रुग्ण (03)*उस्मानपुरा (1), एन नऊ पवन नगर (1), एन दोन सिडको (1)

मनपा हद्दीतील रुग्ण (41)

उस्मानपुरा (1), एन नऊ पवन नगर (1), एन दोन सिडको (1)श्रेय नगर (1), अन्य (1), महेश नगर (1), केशववाडी नगर (2), रहीम नगर, देवळाई चौक (1), विद्यानगर (1)नक्षत्रवाडी (2), भावसिंगपुरा (1), छत्रपती नगर, बीड बायपास (1), राजीव गांधी नगर (1), छावणी परिसर (3), पन्नालाल नगर (3), पद्मपुरा (1), खोकडपुरा (1), टाऊन सेंटर (2), पंचशील नगर (5), आयोध्या नगर (2), ठाकरे नगर, एन दोन (1), चेलिपुरा (1), एन दोन सिडको (1), धूत हॉस्पीटल परिसर (1), हर्सुल (3), बन्सीलाल नगर (2)

ग्रामीण भागातील रुग्ण (8)

रांजणगाव (4), कन्नड बाजारपेठ परिसर (1)वैजापूर (1), वडगाव कोल्हाटी, बजाज नगर (1), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (1)

सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत जालान नगरातील 80, इसारवाडी, पैठणमधील 70, गणेश कॉलनीतील 77, रेल्वे स्टेशन परिसर, उस्मानपुऱ्यातील 66 वर्षीय पुरूष आणि पंढरपूर, वाळूजमधील 56 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.घाटीत खुलताबादेतील 60 वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *