सदाभाऊ खोतांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई : भाजपने राज्यसभा निवडणुकीत उमेदवार दिला आहे. तर आज विधान परिषद निवडणुकीसाठी शेतकरी नेते सदाभाऊ खोतांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून खोतांना भाजपने पाठींबा दिला आहे. यामुळे राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांना आता चांगलीच रंगत आली आहे.

भाजपने राज्यसभा निवडणुकांत उमेदवार दिल्याने शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगला आहे. तर, विधान परिषद निवडणुकीसाठीही ऐनवेळी सहावा उमेदवार देत निवडणुकीत राजकीय चुरस निर्माण केली आहे. या सहाव्या जागेसाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना भाजपचे समर्थन असणार आहे.

भाजपकडून यंदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिटणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपने या निवडणुकीतही पंकजा मुंडे यांना संधी दिलेली नाही. मात्र, आता सहाव्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांना मैदानात उतरवले आहे.

उमा खापरे यांच्यासोबत त्यांनी विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल केला.