औरंगाबाद जिल्हयात ४१ हजार शेतकर-यांच्या १२ लाख क्विटंल कापसाची खरेदी

औरंगाबाद,दि.२६- राज्यात चालू वर्षात विक्रमी कापूस खरेदी झाली असून औरंगाबाद जिल्ह्यातही मुदतीत सर्व नोंदणीकृत शेतक-यांच्या कापसाची खरेदी झाली आहे.खरीप हंगाम 2019-20  मध्ये कापूस खरेदी केंद्रांवर जिल्हयात एकूण ४१ हजार ८४८ शेतकर-यांच्या १२ लाख ४० हजार २७५ इतक्या क्विटंल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. आज जिल्हयामध्ये एकाही नोंदणीकृत शेतक-याचा कापुस  खरेदी शिल्लक नाही. जिल्हयात कापुस पणन महासंघाने कापुस विक्री केलेल्या शेतक-यांना  427.93 कोटी  रुपये आरटीजीएस द्वारे अदा केले असून मराठवाडा विभागात सर्वात आधी औऱंगाबाद जिल्ह्यातील कापूस खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेडे यांनी दिली.  

        शेतक-यांकडील कापूस हमी भावाने खरेदी करण्यासाठी शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यादृष्टीने विहीत कालमर्यादेत नोंदणी झालेल्या शेतक-यांचा कापूस प्राधान्याने खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या निर्देशानुसार जिल्हा उपनिबंधक श्री. दाबशेडे यांनी प्रभावी नियोजन करत यंत्रणेच्या सहाय्याने जिल्हयातील कापूस खरेदी प्रक्रिया वेळेच्या आत पूर्ण केली.         

     औरंगाबाद जिल्हयात  महाराष्ट्र राज्य कापुस पणन महासंघ व भारतीय कापुस निगम लि. यांचे मार्फत पैठण,गंगापूर,फुलंब्री,सिल्लोड कन्नड व  वैजापूर या तालुक्यांमध्ये खरीप हंगाम 2019-20 कापूस खरेदी केंद्र चालु करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र राज्य कापुस पणन महासंघच्या कृ.उ.बा.स. पैठण अंतर्गत दिपक जिनिंग ‍  प्रेसिंग , सोमानी जिनिंग प्रेसिंग , मीनाक्षी कॉटन बालानगर. कृ.उ.बा.स.पैठण भंडारी प्राईम कोटेक्स जिनिग प्रेसिंग धनगांव , कृ.उ.बा.स पैठण अंतर्गत विठठल कृपा जिनिंग प्रेसिंग निलजगांव. , कृ.उ.बा.स.गंगापुर अंतर्गत  रिध्दी सिध्दी जिनिंग प्रेसिंग   , शुभलक्ष्मी  तुर्काबाद , सिल्लोड कृ.उ.बा.स.सिल्लेाड अंतर्गत 1) पुनीत इंटर प्रायजेस   2) राधासर्वेश्वर   3) किंजल जिनिंग प्रेसिंग. , खामगाव फाटा कृ.उ.बा.स.फुलंब्री अंतर्गत राजेंद्र फायबर्स यांच्या कडे तसेच भारतीय कापुस निगम लि.अंतर्गत कृ.उ.बा स.वैजापूर अंतर्गत बालाजी जिनिग प्रेसिंग शिऊर बंगला वैजापूर. , कृ.उ.बा स. लासुर स्टेशन अंतर्गत एम.एस.कॉर्पोरेशन जिनिंग डोनगांव. , कृ.उ.बा स.कन्नड अंतर्गत (शाखांबरी ॲग्रो इंडट्रीज विठठलपुर) , कृ.उ.बा स.गंगापूर (सिध्दार्थ जिनिंग डाबरगांव फाटा), कृ.उ.बा स.पैठण   (कालीका  व  दत्तात्रय जिनिंग प्रे. पाचोड)याठिकाणी कापूस खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

जिल्हयामध्ये लॉकडाऊन कालावधीमध्ये जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, औरंगाबाद  यांचे प्रयत्नातुन खालील प्रमाणे कापसाची खरेदी झालेली आहे.

  कोव्हीड-19 नंतर व लॉक डाऊन कालावधीलमधील खरेदीकेंद्र निहाय माहिती.

अ.क्रकापुस खरेदी केंद्राची संख्याकेंद्र सुरु झाल्याचा दिनांककोव्हीड-19 नंतर कापूस विक्रीसठी नोंदणी केलेल्या शेतक-यांची संख्याकापुस खरेदी
शेतकरी संख्या
खरेदी (क्विंटल )कापुस संघ/सीसीआय 
11)मिनाक्षी 2)सोमानी 3)दिपक   जिनिंग प्रसिंग फॅक्ट्री बालानगर.पैठण अंतर्गत28.04.204159101937986 कापूस संघ
2पैठण (धनगांव)भंडारी प्राईम कोटेक्स जिनिग प्रेसिंग07.05.201535872.3 कापूस संघ
3विठठल कृपा जिनिंग प्रेसिंग निलजगांव  अंतर्गत06.04.201384558.3 कापूस संघ
  कृ.उ.बा स. पैठण  1)कालीका 2)  दत्तात्रय जिनिंग प्रे. पाचोड21.05.2047214943.45सीसीआय
41)रिधी सिधी 2) शुभ लक्ष्मी जिनिंग प्रेसिंग तुर्काबाद कृ.उ.बा.स.गंगापुर28.04.203956101532656.5 कापूस संघ
 कृ.उ.बा स.अंतर्गत गंगापूर सिध्दार्थ  जिनिंग babargaon12.05.201975062.80सीसीआय
 गंगापूर 1)आंनद कॉटन जिनिंग प्रेसिंग21.05.2078124589सीसीआय
5सिल्लोड अंतर्गत 1) पुनीत इंटर प्रायजेस   2) राधासर्वेश्वर   3) किंजल जिनिंग प्रेसिंग.4)ऋषि फायबर्स 28.04.203891267687850.35 
6राजेंद्र फायबर जिनिंग प्रसिंग,खामगाव फाटा फुलंब्री अंतर्गत27.04.20241492527363.45 कापूस संघ
7एम.एस.कॉर्पोरेशन जिनिंग 1)डोनगांव  2) पारस जिनिंग लासुर स्टेशन27.04.20161347211479.95सीसीआय
81)बालाजी 2)शुभम 3) गोदावरी  जिनिग प्रेसिंग शिऊर बंगला वैजापूर04.05.20197648015731सीसीआय
9वैजापूर 1)एस एस ॲग्रो चोर वाघलगांव25.05.201113799सीसीआय
10कृ उ.बा.स कन्नड  अंतर्गत (शाखांबरी ॲग्रो इंडट्रीज विठठलपुर):15.05.207271233630.43सीसीआय
 एकुण 187368562275523 
 गोषवारा     
 तपशिलशेतकरी संख्याखरेदी (क्विंटल)   
 कापुस पणन महासंघ5926196286.9   
 सी.सी.आय.263679235.63   
 एकुण8562275522.53   

खरीप हंगाम 2019-20 कापूस खरेदी केंद्र कोव्हीड 19 पुर्वी व नंतर खरेदीचा एकत्रित गोषवारा खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.तपशीलकोव्हीड 19 चे आधीकोव्हीड 19 चे नंतरएकुण
शेतकरी संख्याखरेदी (क्विंटल)शेतकरी संख्याखरेदी (क्विंटल)शेतकरी संख्या
(3+5)
खरेदी (क्विंटल)
(4+6)
12345678
1कापुस पणन महासंघ22437627718.40592519628828362824006.35
2सी.सी.आय.10850337032.60263679235.613486416268.23
औरंगाबाद जिल्हा एकुण332879647518561275524418481240275

लॉकडाऊन कालावधीतही खरेदी प्रक्रिया सुरु ठेवण्यासाठी पाठपुरावा –

कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी  देशात पहिल्या टप्यातील लॉकडानच्या कालावधीत केंद्रीय कापूस निगम (CCI) यांच्या मार्फत  करण्यात येणारी कापसाची खरेदी जिल्हयाधिकारी,  यांचे आदेशानुसार स्थानिक स्तरावर वेगवेगळया कारणास्तव बंद करण्यात आली होती. नंतर जिल्हाधिकारी यांच्या 21 एप्रिल  रोजीच्या   आदेशान्वये कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून कापूस खरेदीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांच्या अखत्यारीत खालील 04 तालुक्यात कापुस खरेदी केंद्र चालु करण्याबाबत  मंजूरी दिली. तसेच सबंधीत तालुक्याचे उपविभागीय अधिकारी यांना संबंधीत जिनिंग प्रेसिंगच्या केंद्रावर भेट देवून विचार विनिमय करण्यासाठी आदेशीत केले होते. त्यानुसार जिल्हयातील संबंधीत सहायक निबंधक, बाजार समितीचे सचिव व महाराष्ट्र कॉटन मार्केटिंग फेडेरेशन यांचे अधिकारी/प्रतिनिधी संबंधीत जिनिंग प्रेसिंग केंद्रावर उपविभागीय अधिकारी यांचे समवेत उपस्थित राहुन जिनिंग मालकाशी चर्चा  करुन शेतकरी वर्गाचे नुकसान न होऊ देण्याच्या दृष्टीने खरेदी सुरु करण्यासाठी सांगितले.त्यास जिनिंग मालकांनी सहमती दर्शविली. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,औरंगाबाद व त्यांचे अधिनस्त कार्यालयातील सहायक निबंधक, यांच्या पाठपुरवठयामुळे  जिल्हयात जिनिंगवर कापुस खरेदी  चालु  करण्यात आली.

शासनाचे आणि जिल्हा प्रशासनाचे आदेश असतांना देखील काही जिनिंग प्रेसिंग सुरु केलेले नव्हते.तसेच सुरु केले असले तरी प्रतिदिन अत्यंत कमी कापुस खरेदी करत असल्याचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,औरंगाबाद यांनी जिल्हाधिकारी यांचे  निदर्शनास आणुन दिले.त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी  कापुस उत्पादक शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीकोणातुन  जिल्हयातील जिनिंग प्रेसिंगचा परवाना रद्द करण्या बाबतचे आदेश संबंधीत प्राधिकरणास का देण्यात येवु  नये या बाबतची कारणे दाखवा नोटीस जिल्हयातील 20  जिनिंग प्रेसिंग चे प्रोपा/व्यवस्थापक ,महाप्रबंधक,भारतीय कपास निगम लि.(सी.सी.आय) औरंगाबाद विभाग व विभागीय व्यवस्थापक,महाराष्ट्र राज्य कापुस महासंघ विभागीय कार्यालय औरंगाबाद यांना देवुन कारणे दाखवा नोटीस देवुन खुलासा सादर करण्याच्या सुचना दिल्या.

तसचे जिल्हाधिकारी यांनी 15 मे  रोजी जिनिंग प्रेसिंग चे प्रोपा/व्यवस्थापक , महाप्रबंधक,भारतीय कपास निगम लि.(सी.सी.आय) औरंगाबाद विभाग व विभागीय व्यवस्थापक,महाराष्ट्र राज्य कापुस महासंघ विभागीय कार्यालय औरंगाबाद यांना कोणत्याही परिस्थिती मध्ये दिनांक 31 मे पर्यंत जिल्हयातील कापुस खरेदी  करणे यासाठी स्थानिक मजुरांकडुन काम करुन घेणे. तसेच भारतीय कपास निगम यांनी वैजापूर येथे व गंगापुर येथे नविन खेरदी केंद्र चालु करणे  विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कापूस महासंघ विभागीय  कार्यालय औरंगाबाद यांनी  सिल्लोड येथे दोन जिनिंग वर   खरेदी केंद्र  सुरु  करण्याची कार्यवाही  करण्याचे आदेश दिले. जिनिंग प्रेसिंगची युनिटवरील लाईट खंडीत होणार नाही या बाबत  महावितरण यांचे अधिका-यांना सुचना दिल्या. यामुळे जिल्हयातील कापुस खरेदी  सुरुळीत झाली.

कापुस खरेदीचा वेग वाढण्यासाठी विशेष प्रयत्न –  जिल्हयात पणन महासंघाचा फक्त आठ ग्रेडर असल्यामुळे जास्त शेतक-यांना मोठया प्रमाणात कापुस खरेदीसाठी संदेश देणे शक्य होत नाही. पावसाळयापुर्वी कापुस खरेदी करण्यासाठी जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी,औरंगाबाद यांचे आस्थापने वरील एमएससी (कृषि) /बि.एस.सी (कृषि)  शैक्षणीक अर्हता धारण करणारे तालुकास्तरीय  पाच (5)कृषि पर्यवेक्षक  यांना ICAR-CIRCOT, माटुंगा मुंबई, येथे जिल्हा नियोजन समिती(डी.पी.डी.सी) यांचे  खर्चातुन प्रशिक्षण देवुन  त्यानुसार त्यांनी सिल्लोड, फुलंब्री, पैठण व गंगापूर येथील कापुस खरेदी केंद्रावर  तात्पुरती नेमणुक देण्यात आली.यामुळे कापुस खरेदीचा वेग वाढण्यास मदत झाली.

तालुका निहाय शिल्लक कापुस विक्रीसाठी कापुस उत्पादक शेतक-यांकडे प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी/पडताळणी समितीचे गठन – पावसाळयाची सुरुवात असल्यामुळे कापुस उत्पादक शेतक-यांकडे नेमका किती कापुस विक्रीसाठी शिल्लक आहे, याचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे औरंगाबाद जिल्हयातील कृषि उत्पन्न्‍ बाजार समितीकडे विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतक-यांकडे प्रत्यक्षात किती कापुस शिल्लक आहे, याची तपासणी/पडताळणी होणे आवश्यक होते त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी  दिनांक 29 मे रोजी आदेश देवुन तालुका निहाय किती कापुस विक्रीसाठी शिल्लक आहे, याबाबत कापुस उत्पादक शेतक-यांकडे प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी/पडताळणी करण्यासाठी तहसिलदार, सहायक निबंधक, ग्रामसेवक,तलाठी व गटसचिव यांची नेमणुक केली. त्यानुसार तपासणी अंती 65 टक्के शेतक-यांकडे कापुस  नसल्याचे निदर्शनास आले.

जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेडे – खऱेदी प्रक्रिया वेळेत योग्यरित्या पूर्ण करण्यासाठी सीसीआय,कॉटन फेडरेशनची कार्यपद्धती जिल्हा उपनिबंधक कार्यालय,सहाय्यक निबंधक कार्यालयांच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या दृष्टीने  कायदेशीर अधिकार देणे गरजेचे आहे. तसेच ही प्रक्रिया गतिमान व पारदर्शक होण्याच्या दृष्टीने कापूस खरेदी नोंदणी प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन करणे आणि नोंदणी झाल्याबरोबर त्यानुसार तपासणी करण्याची कार्यवाही सुरु करणे आवश्यक असल्याचे श्री.दाबशेडे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी, संबंधीत तालुक्याचे उपविभागीय अधिकारी  व  जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,औरंगाबाद त्यांचे अधिनस्त सहायक निबंधक, सहकारी संस्था ता.पैठण सिल्लोड, वैजापूर,कन्नड,गंगापूर व फुलंब्री व कृषि उत्पन्न बाजार समिती,पैठण,वैजापूर,गंगापूर लासुर स्टेशन,सिल्लोड व फुलंब्री  यांचे प्रयत्न यामुळे जिल्हयातील कोव्हीड-19 लॉकडाऊन कालावधीमध्ये कापुस खरेदी  शक्य झालेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *