आझादी का अमृत महोत्सव समारंभाचा भाग म्हणून 8 जून रोजी देशातील सर्व जिल्हयात सर्व सार्वजनिक बँकांचा पतवितरण माहिती कार्यक्रम

आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाचा भाग म्हणून देशभरातील सर्व सार्वजनिक बँका, सर्व जिल्हयात, उद्या म्हणजेच 8 जून 2022 रोजी व्यापक पत वितरण माहिती कार्यक्रम राबवणार आहेत. या अंतर्गत, सर्व ग्राहक आणि संबंधितांना पतविषयक सुविधांची माहिती देत, त्यांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे. तसेच विविढ सरकारी योजनांसाठी लाभार्थी नागरीकांची नोंदणीही केली जाईल. या जिल्हयास्तरीय कार्यक्रमाचे संयोजन सर्व सार्वजनिक बँका आणि राज्य स्तरीय बँकर्स समित्या करतील.

केंद्रीय वित्त मंत्रालय सध्या आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत, 6 ते 12 जून या काळात, आयकॉनिक वीक साजरा करत आहे. या सप्ताहाच शुभारंभ, नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत झाला.

या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या माध्यमातून, आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम देशाच्या सर्व भागात घेऊन जाण्याचा उद्देश आहे, जेणेकरुन जास्तीत जास्त कर्मचारी आणि ग्राहक यात सहभागी होऊ शकतील. सर्व राज्यस्तरीय बँक समित्या पतविषयक योजनांची माहिती देण्याविषयीचे कार्यक्रम आयोजित करतील. तसेच, प्रधानमंत्री जीवनज्योती बिमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना (PMSBY)आणि अटल पेन्शन योजना (APY), अशा योजनांसाठी लाभार्थी नागरिकांची नोंदणी करतील. त्याशिवाय, ग्राहक जनजागृती आणि वित्तीय साक्षरता तसेच विविध बँकांच्या शाखांनी केलेले कार्य, याचा आढावाही यावेळी घेतला जाईल.