वैजापूर बाजार समितीचे सचिव विजय सिनगर यांना सेवनिवृत्तीबद्दल निरोप

वैजापूर ,६ जून  /प्रतिनिधी :-वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विजय सिनगर यांना सेवानिवृत्तीबद्दल निरोप देण्यात आला. आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, बाजार समितीचे सभापती भागीनाथ मगर, माजी सभापती आसाराम पाटील रोठे, संजय पाटील निकम,उप सभापती विष्णुभाऊ जेजुरकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रमोददादा जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर, आर.डी.थोट, कल्याण पाटील जगताप, सुरेश तांबे, अमोल बोरणारे, चंचल मते यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.