खंडाळा येथे पद्मश्री डॉ.विकास महात्मे व आ.गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत बुधवारी अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव

वैजापूर ,३ जून  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे पद्मश्री खा.डॉ.विकास महात्मे, आमदार गोपीचंद पडळकर व धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष बापूसाहेब शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी सायंकाळी 7 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव साजरा होणार आहे.
यानिमित्ताने गावातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे तसेच पुजन, व महाआरतीचा कार्यक्रम होणार आहे. या जयंती सोहळयात गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. पिवळे ध्वज, पारंपारिक वाद्य, सडा- रांगोळी, तसेच वारकरी, महिला, अबालवृद्ध या मिरवणुकीत सहभागी होतील.

औरंगाबाद जिल्ह्यातील सामाजिक, राजकिय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात येणार आहे.अतिशय भव्यदिव्य शिस्तबद्ध कार्यक्रम करण्याचा मानस असून तशी तयारी सुरू आहे. यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहणार आहे. अशी माहिती आयोजक धनगर समाज संघर्ष समिती शाखा खंडाळा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती, खंडाळा तालुका वैजापूरच्यावतीने देण्यात आली आहे