नॅशनल हेराल्ड प्रकरण: ईडीने गांधी यांना पुन्हा समन्स बजावले

नवी दिल्ली:- काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या चौकशीत सामील होण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नवीन समन्स बजावले आहे.त्यांना  १३ जून रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे मांडावे लागणार आहे.

तत्पूर्वी, त्यांना  २ जून रोजी तपास यंत्रणेसमोर हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते.राहुल यांनी  तपास यंत्रणेला विनंती केली होती की, ते  परदेशात असल्याने तपासात सहभागी होण्यासाठी काही वेळ द्यावा.
समन्स मिळाल्यानंतर, राहुलने ईडीला पत्र लिहून सांगितले की ते 2 जून रोजी तपासात सहभागी होऊ शकणार नाहीत. त्यांनी केंद्र एजन्सीकडे वेळ मागितला होता.

ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चौकशीत सहभागी होण्यासाठी समन्स बजावले होते.सोनिया गांधी यांना ८ जून तर राहुल यांना गुरुवारी (२ जून) समन्स बजावण्यात आले होते. आता राहुल गांधी यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे.या दोघांनी तपास यंत्रणेसमोर हजर राहून जबाब नोंदवावा, अशी ईडीची इच्छा आहे.

सूत्रांनी सांगितले की, दोघांनाही ईडीच्या दिल्ली मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.नॅशनल हेराल्डच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुरुवातीला हा खटला केंद्रीय अन्वेषण विभागाकडे दाखल करण्यात आला होता आणि ईडीचा खटला सीबीआयच्या केसवर आधारित आहे.