लॉकडाऊनच्या काळात 12 हजार 930 शेतकऱ्यांचा 3 लाख 58 हजार 558 क्विंटल कापुस खरेदी

149 कोटी 39 लक्ष रुपयांचा मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

जालना, दि. 25 :-कोरोना विषाणुने संपुर्ण जनजीवन विस्कळीत करत सर्वांसमोर एक आव्हान उभं केलं आहे. या कोरोनावर मात करुन विस्कटलेली घडी परत स्थीर करण्यासाठी शासनासह, प्रशासनामार्फत अहोरात्र प्रयत्न करण्यात येत आहेत. याच कोरोनामुळे शासनाला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला आणि जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याने पिकवलेला कापूस विक्रीविना त्याच्या घरातच पडून राहिला. जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे तसेच उपनिबधंक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांनी जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या कापसाचे शेवटचे बोंड विक्री होऊन शेतकऱ्याला त्याच्या पिकाचा मोबदला मिळावा यादृष्टीकोनातुन केलेल्या अथक प्रयत्नातुन जिल्ह्यात कापुस लॉकडाऊनच्या काळामध्ये एकुण 12 हजार 930 शेतकऱ्यांचा तब्बल 3 लाख 58 हजार 558 क्विंटल कापुस खरेदी होऊन या कापसाच्या मोबदल्याच्या एकुण 167 कोटी 95 लक्ष रुपयांपैकी 149 कोटी 39 लक्ष रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

कोरोना विषाणुने भारतामध्ये व महाराष्ट्र राज्यामध्ये शिरकाव केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढु नयेत यादृष्टीकोनातुन मार्चमध्ये शासनाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या परिस्थितीमध्ये केवळ वैद्यकीय सेवांना परवानगी देत सर्व व्यवहार थांबविण्याचे निर्देश दिले. त्यामुळे जालना जिल्ह्यातील सर्व व्यवहारही थांबले गेले. या परिस्थितीमध्ये बळीराजाने पिकविलेला कापुस कापुस खरेदी केंद्र बंद असल्याने कारणाने घरातच पडुन राहिला. जिल्ह्यातील ही परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कापुस खरेदी केंद्रे सुरु होऊन शेतकऱ्यांचा कापुस विक्री होण्याच्यादृष्टीने पाऊले उचलली.

कापुस सर्व्हेक्षणासाठी गुगल लिंकबरोबरच तालुकानिहाय समित्यांचे गठण जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे विक्रीविना किती कापुस पडुन आहे याची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी गुगललिंक तयार करुन शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापसाची माहिती ऑनलाईन भरुन देण्याचे आवाहन केले. या गुगल लिंगद्वारे 40 हजार 577 शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापसाची माहिती जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करुन दिली. तसेच प्रत्येक गावनिहाय शेतकऱ्यांकडील कापसाच्या माहितीचे सर्व्हेक्षण करण्यासाठी सहाय्यक निबंधक, तलाठी, ग्रामसेवक, सहकारी संस्थांचे सचिव, कृषि उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या समित्या गठीत करण्यात आल्या. जिल्ह्यातील 972 गावांपैकी 884 गावांच्या सर्व्हेक्षणासाठी 660 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊन शेतकऱ्यांकडे विक्रीविना पडून असलेल्या कापसाची माहिती संकलित करण्यात आली.

कापुस सर्व्हेक्षणासाठी गुगल लिंकबरोबरच तालुकानिहाय समित्यांचे गठण जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे विक्रीविना किती कापुस पडुन आहे याची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी गुगललिंक तयार करुन शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापसाची माहिती ऑनलाईन भरुन देण्याचे आवाहन केले. या गुगल लिंगद्वारे 40 हजार 577 शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापसाची माहिती जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करुन दिली. तसेच प्रत्येक गावनिहाय शेतकऱ्यांकडील कापसाच्या माहितीचे सर्व्हेक्षण करण्यासाठी सहाय्यक निबंधक, तलाठी, ग्रामसेवक, सहकारी संस्थांचे सचिव, कृषि उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या समित्या गठीत करण्यात आल्या. जिल्ह्यातील 972 गावांपैकी 884 गावांच्या सर्व्हेक्षणासाठी 660 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊन शेतकऱ्यांकडे विक्रीविना पडून असलेल्या कापसाची माहिती संकलित करण्यात आली.

लॉकडाऊनमुळे बंद पडलेली कापुस खरेदी केंद्रे सुरु व्हावीत यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, उपजिल्हा निबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांनी जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे पदाधिकारी, जिनिंग प्रेसिंगचे मालक यांच्यासोबत मार्च व एप्रिल महिन्यांमध्ये सातत्याने बैठका घेऊन केंद्रे तातडीने सुरु करण्यासंदर्भात पाठपुरावा केला. या पाठपुराव्यास यश येऊन कापुस खरेदी केंद्रे सुरु होऊन शेतकऱ्यांचा कापुस खरेदीस प्रारंभ झाला.

जालना जिल्ह्यामध्ये सीसीआय व फेडरेशनची एकुण सहा कापुस खरेदी केंद्रे कार्यरत होती. परंतू लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना त्यांचा कापुस विक्री न करता आल्याने आवक नसल्याने ही केंद्रे बंद पडली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्याचा कापुस खरेदी व्हावा यासाठी बंद असलेली सहा केंद्रे सुरु करण्याबरोबरच नव्याने चार केंद्रे सुरु करण्यासाठी यंत्रणेच्या माध्यमातुन पाठपुरावा केल्याने दहा केंद्राच्या माध्यमातुन कापसाची खरेदी करण्यात आली. जिल्ह्यातील पूर्वीच्या सहाच कापुस खरेदी केंद्रावर ग्रेडर होते. नव्याने सुरु केलेल्या केंद्रावर ग्रेडरअभावी कापसाची खरेदी थांबु नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषि विभागातील बीएसस्सी ॲग्री शिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांची निवड करत त्यांना नागपुर येथे ग्रेडरचे प्रशिक्षण देऊन चारही केंद्रावर ग्रेडर म्हणून नियुक्त्या देण्यात आल्या. तसेच आठवड्यातील केवळ पाच दिवस खरेदी होणाऱ्या केंद्रावर शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीही कापुस खरेदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने आठवड्यातील सातही दिवस या दहा केंद्राच्या माध्यमातुन पुर्ण क्षमतेने कापसाची खरेदी करण्यात आली.

जालना जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा कापुस खरेदी व्हावा यादृष्टीकोनातुन प्रत्येक जिनिंग मालकांना प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले होते. जिनिंग सुरु करण्यासाठी आवश्यक असणारे सर्वतोपरी सहकार्यही करण्यात आले. याउपर ज्या जिनिंग मालकांनी शेतकऱ्यांचा कापुस खरेदी केला नाही अशा जिनिंग मालकांवर कारवाई करत त्यांचा परवाना रद्द करण्याबरोबरच जिनिंगचा समावेश काळ्या यादीतही करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात 12 हजार 930 शेतकऱ्यांचा 3 लाख 58 हजार 558 क्विंटल कापुस खरेदी जालना जिल्ह्यामध्ये लॉकडाऊननंतर शेतकऱ्यांनी पिकवलेला कापुस त्यांच्या घरात पडून होता. प्रशासनाच्या प्रयत्नानंतर जालना तालुक्यातील 2 हजार 935 शेतकऱ्यांचा 72 हजार 249 क्विंटल कापुस खरेदी करण्यात आला. बदनापुर तालुक्यातील 982 शेतकऱ्यांचा 26 हजार 603 क्विंटल, भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यातील 2 हजार 192 शेतकऱ्यांचा 73 हजार 271 क्विंटल, परतुर तालुक्यातील 2 हजार 104 शेतकऱ्यांचा 46 हजार 904 क्विंटल, मंठा तालुक्यातील 1 हजार 383 शेतकऱ्यांचा 36 हजार 225 क्विंटल तर घनसावंगी व अंबड तालुक्यातील 3 हजार 334 शेतकऱ्यांचा 83 हजार 306 क्विंटल अशा प्रकारे 12 हजार 930 शेतकऱ्यांचा 3 लाख 58 हजार 558 क्विंटल कापुस खरेदी करण्यात आला असुन या कापसाच्या खरेदीपोटी 10 हजार 146 शेतकऱ्यांना 149 कोटी 39 लक्ष रुपयांचा मोबदला देण्यात आला असुन उर्वरित शेतकऱ्यांना 18 कोटी 56 लक्ष रुपयांचा मोबदला वितरित करण्याची कार्यवाही सुरु आहे. पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी केली अचानक पहाणी जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या कापुस खरेदी केंद्रांना राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अचानकपणे भेट देत शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येत असलेल्या कापसाची पहाणी केली. यावेळी एकाही शेतकऱ्याचा कापुस खरेदीविना पडून राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.

जिल्हाधिकाऱ्यांची कार्यतत्परता

वेळ सकाळी 7.20 ची. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मोबाईलवर बदनापुर तालुक्याच्या ढोकसाळ येथील शेतकरी रवींद्र जाधव यांचा संदेश येऊन धडकतो. साहेब कापुस खरेदी केंद्रावर कापसाचे वाहन रिकामे करण्यासाठी बाराशे ते पंधराशे रुपये घेऊन शेतकऱ्यांची लुट करत आहेत. शेतकऱ्यांची ही लुट थांबवा साहेब. सकाळी 7.34 वाजता तहसिलदार बदनापुर यांना जिल्हाधिकारी आदेश देतात व या प्रकारची चौकशी करुन तातडीने अहवाल सादर करण्याच्या सुचना निर्गमित होतात. दुपारी 1.35 वाजता पांडुरंग जाधव यांचा परत जिल्हाधिकाऱ्यांना मोबाईलवर संदेश येतो व साहेब आपल्या टीमने कापुस खरेदी केंद्रावर येऊन चौकशी केली व माझे अतिरिक्त पैसेही मला मिळवुन दिल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे धन्यवाद व्यक्त करतात. जालना तालुक्यातील सारवाडी येथील शेतकरी रामकिसन त्रिंबक काळे शिंदे म्हणतात चार एकर शेतीमध्ये कापसाची लागवड केली होती. 25 क्विंटल कापसाचे उत्पादन झाले. परंतू कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कापुस घरातच पडुन होता. प्रशासनामार्फत आमच्या घरी येऊन पडून असलेल्या कापसाची नोंदणी करण्यात आली. तदनंतर जिनिंगवर कापुस विक्रीसाठी घेऊन या असा संदेशही मोबईलवर प्राप्त झाला. कापुस विक्री केल्यानंतर केवळ नऊ दिवसामध्ये कापुस विक्रीचा 1 लाख 32 हजार रुपयांचा मोबदलाही मिळाला. शेतीच्या मशागतीसाठी या पैशाचा खुप मोठा आधार झाला असुन लॉकडाऊनच्या काळात शासनाने आमचा कापुस विकत घेऊन मोबदलाही दिल्याने त्यांनी धन्यवाद व्यक्त केले आहेत. एकुणच कोरोनाच्या संकटसमयीसुद्धा शासन व प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पीकांच्या पेरणीसाठी आवश्यक असणारे पीककर्ज, शेतकऱ्याला पेरणीसाठी आवश्यक असणारे बि-बियाणे, खतांचा मुबलक पुरवठा यासह शेतकऱ्याने उत्पादित केलेला मालही वेळेत विक्री व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *