जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहिर

प्रभाग रचना कार्यक्रम जाहिर

औरंगाबाद ,१ जून /प्रतिनिधी :- जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक – 2022 करिता सुरुवातीला औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 62 गट व 124 गट होते परंतु सध्या 70 गट असुन 140 गण आहे. राज्य निवडणूक आयोग यांच्या पत्रानुसार यांनी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरीता प्रभाग रचना कार्यक्रम जाहिर केला आहे. सदर प्रभाग रचनेची अधिसूचनेला मा.विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांनी दि. 31 मे 2022 रोजी मान्यता दिली असून प्रारुप प्रभाग रचने बाबत मा.जिल्हाधिकारी औरंगाबाद यांचेकडे हरकती व सूचना दि.02 जून 2022 ते 08 जून 2022 या कालावधीमध्ये रेकॉर्ड रुम समोरील स्थापित केलेल्या कक्षात (दुसरा मजला) सादर करावयाचे आहे. सदर अधिसुचना http//:Aurangabad.nic.in या संकेत स्थळावर पाहण्यासाठी मिळेल, असे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी कळविले आहे.