वैजापूर तालुक्यातील बिलोणी येथे 1 कोटी 79 लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमीपूजन

वैजापूर ,३१ मे /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील बिलोणी येथे आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या स्थानिक विकास निधीतून व विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या 1 कोटी 79 लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आ.रमेश पाटील बोरणारे  यांच्याहस्ते सोमवारी (ता.31) झाले.
बिलोणी फाटा ते पुलापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे (75 लक्ष रुपये),  देवीचे मंदीर ते पुलापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे (57 लक्ष रुपये), श्रीक्षेत्र देवी मंदीर परिसर सुशोभीकरण करणे (25 लक्ष रुपये), ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे (12 लक्ष रुपये),बिलोणी शिवरस्ता ते लाख रस्ता पुलांचे बांधकाम करणे (5 लक्ष रुपये) या कामांचे भूमीपूजन व रामेश्वर मंदीर सभामंडप बांधकाम (5 लक्ष रुपये) या कामाचे लोकार्पण अशा एकुण 1 कोटी 79 लक्ष रुपये खर्चाच्या मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर होते. माजी नगराध्यक्ष साबेर खान, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, बाजार समितीचे सभापती भागिनाथ मगर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा लताताई पगारे, जिल्हा परिषद सदस्य दिपकभाऊ राजपूत, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष काझी मलीक यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी आ.रमेश पाटील बोरणारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर ,माजी नगराध्यक्ष साबेर खान आदींची भाषणे झाली. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबद्ध असून आतापर्यंत 250 कोटींचा निधी विविध विकास कामासाठी मंजूर करून आणल्याचे आ.बोरणारे यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य सुरज नाना पवार, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख मोहन पाटील साळुंके, महेश पाटील बुणगे, सिताराम पाटील वैद्य, बाजार समितीचे संचालक साईनाथ पाटील मतसागर, उपसभापती राजेंद्र पाटील चव्हाण, सुनिल कदम, मंजाहारी पाटील गाढे, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत साळुंके, उमेश शिंदे, विभागप्रमुख प्रकाश मतसागर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे विरगांवकर, शासकीय गुत्तेदार संदीप पाटील बोर्डे,उपविभागप्रमुख अशोक हाडोळे, मल्हारी पठाड़े, सरपंच गायत्रीताई कदम, महिला आघाडीच्या उपतालुकाप्रमुख चंद्रकलाताई जाधव, गणेश इंगळे, सुनिल तुपे, चेअरमन संजय जाधव, उपसरपंच नीलकंठ ठोंबरे, प्रमोद गायकवाड, बाळासाहेब चेळेकर, वाल्मिक वाळके, प्रदिप गायकवाड, राजेंद्र बावचे, प्रशांत शिंदे, वाल्मिक बावचे, दादासाहेब ठोंबरे, ईश्वर अंभोरे, नवनाथ गायकवाड, पारसनाथ कदम, सुनिल निपटे, दत्तुभाऊ खिल्लारे, दादासाहेब मतसागर, कैलास कदम, सुभाष सोमासे एन.टी.कदम, पोपट कदम, रावसाहेब कदम, जनार्दन पा कदम, दिलीप देवकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.