राज्यसभेसाठी आता काँग्रेसमध्ये धुमशान, हायकमांडच्या निर्णयावर राज्यातील काँग्रेसचे नेते नाराज?

भाजपकडून राज्यसभेसाठी यादी जाहीर, अनिल बोंडेंना लॉटरी

मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यात संघर्ष पाहण्यास मिळाला. पण, आता काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून राज्याबाहेरील व्यक्तीला संधी दिली जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांनी हायकमांडच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रातून इमरान प्रतापगढी यांचं नाव निश्चित झालं आहे. तसंच बिहारमधून कन्हैया कुमार, कर्नाटकमधून बी.व्ही. श्रीनिवास यांच्या नावाची चर्चा आहे. या तिन्ही नेत्यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस हायकमांड उत्सुक आहे. पण, राज्यातील अनेक जण इच्छुक असताना बाहेरील नेत्याला संधी देत असल्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस नेते नाराज असल्याचे समोर आले आहे. इतर राज्यातील उमेदवार असल्यास क्रॉस व्होट करू, असा निर्धार आता महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रातून इमरान प्रतापगढी यांचं नाव निश्चित केलं आहे. त्यांच्या नावाची घोषणा ही करण्यात आली आहे.  महाराष्ट्रमधून राज्यसभेसाठी इमरान प्रतापगढी यांना पाठवण्यात आले आहे.  इमरान प्रतापगढी हे काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आहेत. त्यांचं नाव हे प्रियंका गांधी यांनीच पुढे केलं असल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, राज्यसभा निवडणुकीत  काँग्रेस एक जागा जिंकू शकते, भाजप 2 आणि राष्ट्रवादी एक जागा जिंकू शकते. एक जागा सुरक्षितपणे जिंकण्यासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अतिरिक्त मतांच्या जोरावर आणखी एका जागेवर काँग्रेस लक्ष ठेवून आहे.

राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून अखेर आपले पत्ते उघडण्यात आले आहे. भाजपकडून  माजी रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि डॉ. अनिल बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडे तिसऱ्या जागेसाठी उमेदवार देणार अशी चर्चा होती, मात्र, तिसऱ्या जागेसाठी अजूनही सस्पेन्स कायम आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी आता चुरस आणखी वाढली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपले उमेदवार निश्चित केल्यामुळे भाजपने आता आपले उमेदवार जाहीर केले आहे. भाजपकडून पियूष गोयल यांच्या नावाची चर्चा सुरू होती. अखेरीस त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यापाठोपाठ अनिल बोंडे यांनाही संधी देण्यात आली आहे.पियूष गोयल यांच्याकडे सध्या केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योगमंत्रालयाची सूत्र आहेत. गोयल यांनी मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये कोळसा मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभाराची जबाबदारी देण्यात आली होती.त्यानंतर सुरेश प्रभू यांनी  2017 मध्ये रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. गोयल यांनी रेल्वे खात्याची जबाबदारी सार्थपणे पार पाडली. इतकंच नाही, तर भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर नसताता गोयल यांनी अर्थमंत्रालयाची धुरा सांभाळली.