चोरवाघलगाव येथे कृषी विभागातर्फे खरीप हंगामपूर्व शेतकरी मार्गदर्शन मेळावा

वैजापूर ,२९ मे /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील चोरवघलगाव येथे कृषी विभाामार्फत खरिप हंगामपुर्व शेतकरी मार्गदर्शन मेळावा झाला.


तालुका कृषी अधिकारी कार्यालय वैजापूरच्यावतीने तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांचे मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्यात कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना विषयी कृषी पर्यवेक्षक माधव गांगुर्डे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये कापूस पीक प्रात्यक्षिक 100 हेक्टरवर गावात राबविणे व एक गाव एक वाण घेणे, बीजप्रक्रिया करणे, बिबिफ वर लागवड करणे , सल्फर खताचा वापर करणे, एकात्मिक खत व्यवस्थापन, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन , सापळा पीक लागवड ,फेरोमन ट्रॅप चा वापर ,शेंडे खुडणे, व स्वच्छ कापूस,वेचणी करणे. प्रक्रिया उद्योग इत्यादी बाबी विषयी प्रकल्पात राबिण्यात येणारे बाबी विषयी मार्गदर्शन केले. कृषी सहायक अर्चना सोनवणे यांनी लाभार्थी निवड करताना 16 टक्के अनुसूचित जाती, 8टक्के अनुसूचित जमाती, 5 टक्के दिव्यांग व 30 टक्के महिला लाभार्थी निवडीचे सांगितले तसेच 7000 हे अनुदान हे निविष्ठा किंवा डीबीटी स्वरूपात देण्याविषयी माहिती दिली. 

या शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यास सरपंच कैलास सातपुते,उपसरपंच दादासाहेब मोईन, कृषी मित्र दत्तू घुले, भिमराज मोईन, लक्ष्मण मोईन, रामनाथ मोईन, गोविंद मोईन, नामदेव मोईन, गोविंद दहिते, गोविंद धांडे, रघुनाथ मोईन, आण्णा पाटील मोईन, सुधाकर दहीते ,वेणूनाथ घुले, कारभारी राऊत, छगन त्रिभुवन,गुलाब त्रिभुवन, नानासाहेब मोईन, हरिभाऊ मोईन, दत्तू मोईन, दादा पवार, संदीप मोईन, अशोक मोईन, सुधाकर दहिटे, अशोक त्रिभुवन ,शंकर मोईन,यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.