मुलांनो आता तुम्ही चांगले रहा असे सांगून आईने विहिरीत प्राण सोडले

जालना ,२८ मे /प्रतिनिधी :-भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथील विवाहितेने मुलांनो आता तुम्ही चांगले रहा, मी मोटर चालू करून येते असे सांगून  विहिरीत उडी मारली, मुलांनी रडत गावात जाऊन सांगितले मात्र आईने विहिरीत प्राण सोडले. शारीरिक व मानसिक छळाच्या त्रासाला कंटाळून  अलका रमेश फुकट वय 30 वर्ष या विवाहितेने 27 मे रोजी शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

मयत विवाहितेच्या आईच्या तक्रारीहून भोकरदन पोलिसांनी सासरकडील 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला  पती रमेश फुकट व दीर शेषराव फुकट यांना पोलिसांनी अटक केली आहे.शनिवारी या प्रकरणी  पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तालुक्यातील कोसगाव येथील अलका रामराम शिंदे यांचा विवाह 13 वर्षांपूर्वी  कुंभारी येथील रमेश दादाराव फुकट यांच्याशी झाला  रमेश याला दारूचे व्यसन लागले. तो मारहाण करायचा.  शारीरिक व मानसिक त्रास द्यायचे  विवाहितेची आई येडूबाई रामराम शिंदे यांच्या तक्रारीहून  पती रमेश फुकट, सासरा महादू भिवसन फुकट, सासू कडूबाई महादू फुकट, दीर शेषराव महादु फुकट, दादाराव महादु फुकट, जाऊ कालिंदा शेषराव फुकट, सुनिता दादाराव फुकट, नणंद संगिता विश्वनाथ शिरसाठ, विमल शेनफड रजाळे, कांचन शालीकराव सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अलकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्याना अटक करा तोपर्यंत मृत्यूदेह ताब्यात घेणार नाही अशी माहेरच्या मंडळीनी भूमिका घेतली होती  5 वाजेच्या दरम्यान  कुंभारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता..

 दिपक  वय 12 व दिपाली वय 7  अशी एक मुलगा व एक मुलगी आहे आईचे निधन झाले वडील जेलमध्ये तर आजी आजोबा फरार झाले आशा परिस्थितीत इतर नातेवाईकांच्या सहकार्याने दिपक या चिमुकल्याने आईला अग्नि दिला यावेळी उपस्थिताच्या डोळ्यात पाणी आले होते.