ऑनलाईन गेम्स् व जुगार यावर नियंत्रण करण्याकरीता त्वरीत कार्यवाही व्हावी-महेश धन्नावत यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

जालना ,२८ मे /प्रतिनिधी :- ऑनलाईन गेम्स् ज्यामध्ये कौशल्याच्या नावाखाली जुगार खेळविले जात आहे व सध्या कोविड परिस्थितीनंतर शिक्षण प्रणाली हि मोबाईल व इंटनेटवर अवलंबुन झालेली असल्याने शाळकरी मुलांच्या हातात मोबाईल व इंटरनेट सेवा आलेली आहे. तसेच अनेक वर्तमान पत्रात व सोशल मिडीयावर मोठे फिल्म अभिनेता घेऊन अशा ऑनलाईन गेम्सची प्रसिध्द कौशल्याच्या नावाखाली केली जाते व त्यामुळे अनेक बेरोजगार युवक तथा लहानमुले त्याचा शिकार होत आहे, कारण हे गेम्स् द्वारे पैसे कमविले जाऊ शकते, अशी जाहिरात सर्वत्र होत आहे.
मद्रास हायकोर्टातील न्यायमुर्ती जस्टीस् किरुबकरन व जस्टीज् पुगललेंडी यांनी व्यक्त केले होते व ऑनलाईन रम्मी गेम चालविणाऱ्या संघटनेला सुध्दा प्रकरणात सामविष्ठ करून घेतले होते. मा. न्यायमुर्तीींनी असे मत सुध्दा व्यक्त केले होते की, जर ऑनलाईन गेम्स् तथा जुगार संदर्भात त्वरीत कायदा आनला गेला नाही व यांना नियंत्रीत केले गेले नाही तर ज्याप्रमाणे अनेक युवक ऑनलाईन गेम्स् साठी उधारी करुन व सर्व जमा पुंजी गमवुन आत्महत्या करीत आहे ते प्रमाण अधिकच वाढले जाईल.
गुजरात, दिल्ली उच्च न्यायालयाने सुध्दा हा विषय गंभीर असल्याबद्दल मत व्यक्त केलेले आहे.महाराष्ट्र शासनाने सुध्दा या संदर्भात त्वरीत कायदा आणने गरजेचे आहे, कारण हा विषय राज्य शासनाचा असल्याने तेच याच संदर्भात कार्य करु शकतात. अनेक लहान मुलांकडुन पैसे घेऊन फ्रीफायर गेम रिचार्ज करुन दिले जाते व त्यासाठी लहान मुले घरातुन पैसे चोरुन अशा समाजकंटक लोकांच्या आहेरी पडत आहे व भविष्य खराब होत आहे. पोलीस सुध्दा अशा तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहे व त्यामुळे राज्यात भविष्यात लहान मुले व युवकांची आत्महत्या होवु शकते.. त्यामुळे ऑनलाईन गेम्स् व जुगार यावर नियंत्रण करण्याकरीता त्वरीत कार्यवाही व्हावी अशी विनंती अॅड. महेश धन्नावत यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.